शिवराज महाविद्यालयात सॅक्स-२०२३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवराज महाविद्यालयात सॅक्स-२०२३
शिवराज महाविद्यालयात सॅक्स-२०२३

शिवराज महाविद्यालयात सॅक्स-२०२३

sakal_logo
By

gad155.jpg
03042
गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयात प्रा. प्रवीण जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी प्रा. आझाद पटेल, डॉ. अनिल कुराडे उपस्थित होते.
---------------------------
शिवराज महाविद्यालयात सॅक्स-२०२३
गडहिंग्लज, ता. १५ : येथील शिवराज महाविद्यालयात कॉम्प्यूटर विभागाचा ‘सॅक्स-२०२३’ कार्यक्रम झाला. प्रा. प्रवीण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. जाधव म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर चांगला नागरिक होणे गरजेचे आहे. विद्यार्थी ही देशाची खरी संपत्ती आहे. विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे.’ संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी शिवराज महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याला घडण्याची संधी उपलब्ध करून देण्यास कट्टीबध्द असल्याचे सांगितले. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांचेही भाषण झाले. कॉम्प्यूटर विभागाच्या विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी कॅड सेंटर गडहिंग्लज व शिवराज महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार झाला.
पोस्टर प्रेझेन्टेशनमधील विजेत्या श्रीया पाटील, ऐश्वर्या हिरेमठ, गीता पाटील, प्रतीक्षा दोरुगडे, दिव्या केरकर, मानस पाटील, पेपर प्रेझेन्टेशनमधील विजेत्या दिया धरणे, मृणाल केसरकर, सृष्टी कुलकर्णी, शुभम मेंगाणे यांना मान्यवरांच्याहस्ते बक्षिस देऊन गौरवले. प्रा. आर. डी. कमते, प्रा. के. एस. देसाई, प्रा. दीपिका खांडेकर-पंडीत, प्रा. रवी खोत, प्रा. आय. पी. सुतार, प्रा. एस. के. पाटील आदी उपस्थित होते. प्रा. आझाद पटेल यांनी स्वागत केले. प्रा. बी. एस. पठाण यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.