छावा, शिवमुद्रा संघांची विजयी सलामी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छावा, शिवमुद्रा संघांची विजयी सलामी
छावा, शिवमुद्रा संघांची विजयी सलामी

छावा, शिवमुद्रा संघांची विजयी सलामी

sakal_logo
By

ich152.jpg
03037
इचलकरंजी ः येथे सुरु झालेल्या कबड्डी स्पर्धेतील शिवमुद्रा आणि बालशिवाजी संघ यांच्यातील सामना चुरशीने झाला.
----------
छावा, शिवमुद्रा संघांची विजयी सलामी
इचलकरंजीत जयहिंद मंडळातर्फे मॅटवरील कबड्डी स्पर्धेस प्रारंभ
इचलकरंजी, ता.१५ ः येथे जयहिंद मंडळाच्या क्रीडांगणावर सुरु झालेल्या मॅटवरील कबड्डी स्पर्धेत छावा (शिरोली) व शिवमुद्रा (कौलव) या संघानी विजयी सलामी दिली. उद्‍घाटनाच्या सामन्यात छावा (शिरोली) संघाने महालक्ष्मी (कुपवाड) संघाचा पराभव केला. दुस-या सामन्यात शिवमुद्रा (कौलव) संघाने बालशिवाजी (शिरोळ) संघाला पराभूत करीत चुरशीने विजय साकारला.
पहिल्या सामन्यात अनुभवी छावा शिरोलीच्या संघाने सुरुवातीपासून वर्चस्व राखले. दोन्ही डावामध्ये आघाडी घेत २९ विरुद्ध ७ अशा तब्बल २२ गुणांच्या फरकाने सामना जिंकला. महालक्ष्मी संघाची खेळी उठावदार झाली नाही. उद्‍घाटनाचा दुसरा सामना शिवामुद्रा विरुद्ध बालशिवाजी यांच्यात रंगला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांनी चुरशीने खेळ दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र उत्तरार्धात मात्र शिवमुद्रा कौलवच्या खेळाडूंनी आक्रमक चढाया केल्या. अभेद्य क्षेत्ररक्षणाच्या बळावर सामना ३४ विरुद्ध २४ असा १० गुणांच्या फरकाने जिंकला.
तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्‍घाटन खासदार धैर्यशील माने यांच्याहस्ते तर मैदान पूजन आमदार प्रकाश आवाडे यांच्याहस्ते झाले. माजी आमदार राजीव आवळे, राहुल खंजीरे, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख रवींद्र माने, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे, बाबासाहेब कलागते, गंगाराम जाधव, महादेव कांबळे, सतिश डाळ्या, अरुण खंजीरे, सदा मलाबादे, उदय चव्हाण आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शामराव कुलकर्णी यांनी केले. देशभक्त बाबासाहेब खंजीरे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त स्पर्धेचे आयोजन केले आहे.
-----
स्पर्धेची आज सांगता
स्पर्धा कोल्हापूर व सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जयहिंद मंडळातर्फे घेण्यात येत आहे. स्पर्धेत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित १८ संघांना निमंत्रित केले आहे. स्पर्धेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून स्पर्धेची उद्या (ता. १६) सांगता आहे.