डीवायपीतर्फे क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीवायपीतर्फे क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण
डीवायपीतर्फे क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण

डीवायपीतर्फे क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण

sakal_logo
By

03052
कोल्हापूर : विजेत्यांचा गौरव करताना आमदार ऋतुराज पाटील, डॉ. ए. के. गुप्ता, डॉ. लीतेश मालदे, डॉ. राजेंद्र रायकर, डॉ. राहुल पाटील, पार्थ पाटील आदी.

खेळातील सहभागही
महत्त्वाचा ः ऋतुराज पाटील

कोल्हापूर, ता. १५ : ‘‘उत्तम करिअर घडवण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता तर हवीच; पण विद्यार्थी दशेत व्यक्तिमत्त्वाचा परिपूर्ण विकास होणेसाठी खेळातील सहभागही महत्त्वाचा आहे. खेळामुळे विद्यार्थी सशक्त बनतात. मनही प्रसन्न राहण्यास मदत होते. यामुळेच गेली ३८ वर्षे डी. वाय पाटील महाविद्यालयातर्फे दर्जेदार शिक्षणाबरोबर वार्षिक क्रीडास्पर्धेचे आयोजन केले जात आहे,’ असे डी. वाय. पाटील संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.
कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. आमदार पाटील यांच्या हस्ते स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ‘उत्कृष्ठ विद्यार्थी ’ पार्थ पाटील, प्रतिक पाटील, अमृत नरके यांचा विशेष सत्कार केला.
संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र रायकर, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. राहुल पाटील उपस्थित होते. डॉ. रायकर यांनी प्रास्ताविक केले.