महाडिक खासदार झाले पण त्या १५ जणांचे काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाडिक खासदार झाले पण त्या १५ जणांचे काय?
महाडिक खासदार झाले पण त्या १५ जणांचे काय?

महाडिक खासदार झाले पण त्या १५ जणांचे काय?

sakal_logo
By

महाडिक खासदार झाले, ‘त्या’ १६ जणांचे काय?

काम करूनही कार्यकर्ते पक्षाबाहेरच ःभाजपमध्ये पुन्हा जुने-नवे वाद सुरू होण्याची चिन्हे


ओंकार धर्माधिकारी : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १५ ः २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांचा प्रचार केला म्हणून भारतीय जनता पक्षातील १६ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर धनंजय महाडिकच भाजपमध्ये आले. इतकेच नाही तर ते पक्षातर्फे राज्यसभेचे खासदार झाले. तरीदेखील हे १६ जण पक्षाबाहेरच आहेत. सध्या भाजपची कार्यकारिणी करण्याचे काम सुरू आहे. आम्हालाही यामध्ये स्थान मिळावे, अशी त्यांची अपेक्षा आहे; मात्र यांचे पक्ष प्रवेश रखडल्याने भाजपमध्ये पुन्हा जुने-नवे वाद सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.
अमल महाडिक यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून २०१४ साली विधानसभेची निवडणूक जिंकली. यावेळी त्यांच्यासोबत महाडिक गटाचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये आले. त्यांनी त्यानंतर झालेल्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये या कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम केले. लोकसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार असलेल्या धनंजय महाडिक यांचा प्रचार केल्याने या १६ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांना पक्षाच्या कार्यक्रमांना, बैठकांना बोलावणे बंद झाले. त्यांच्याकडे जे पद होते, तेथे पर्यायी व्यक्ती देण्यात आल्या; मात्र त्यानंतरही हे १६ जण महाडिकांसोबत होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण मतदारसंघात त्यांनी अमल महाडिक यांचा प्रचार केला. त्यानंतर झालेल्या ‘उत्तर’च्या पोटनिवडणुकीतही हे सक्रिय होते. ज्या कारणासाठी त्यांना पक्षाने अंतर दिले, ते कारणही आता राहिले नाही. कारण धनंजय महाडिक भाजपमध्ये आले आणि खासदारही झाले; पण हे १६ जण मात्र आजही पक्षाबाहेरच आहेत. नव्या कार्यकारिणीत संधी मिळावी एवढीच त्यांची अपेक्षा आहे. त्यांना पुन्हा पक्षात घेऊन पद देण्यासाठी खासदार धनंजय महाडिक प्रयत्न करणार का, असा प्रश्न यानिमित्ताने कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.
---------

हे आहेत ‘ते’ १६ कार्यकर्ते

जयराज निंबाळकर, वैशाली पसारे, अमित पसारे, धैर्यशील देसाई, महेश चव्हाण, कुलदीप देसाई, रणजित जाधव, महेश घोडके, गणेश खाडे, सतीश घरपणकर, संतोष जाधव, कुलदीप सावसकर, धनंजय जरग, शेखर जाधव, शिवप्रसाद घोडके, सोनल घोटणे.
-----------

ग्रामीण जिल्हाध्यक्ष
पदासाठी मुलाखत

भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी आज मुलाखती घेण्यात आल्या. शासकीय विश्रामगृहात पक्ष निरीक्षक भरत पाटील यांनी या मुलाखती घेतल्या. ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी संवाद साधला. तसेच प्रमुख तालुका प्रतिनिधींशीही त्यांनी अध्यक्षपदाबाबत चर्चा केली.