
महाआरोग्य शिबिर
`आपला दवाखाना’ येथे
आज महाआरोग्य शिबिर
कोल्हापूर, ता. १५ : महापालिका आरोग्य विभागामार्फत ‘जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची’ या उपक्रमांतर्गत मंगळवारी (ता. १६) महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे. ताराबाई पार्क, पितळी गणपती मंदिरजवळील बाळासाळेब ठाकरे आपला दवाखाना येथे सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत शिबिर होणार आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री मातृत्व योजना व इतर सर्व योजनांची माहिती देण्यात येणार आहे. याबरोबरच गरोदर माता तपासणी, प्रसुती पश्चात तपासणी, महिला आरोग्य तपासणी, सल्ला व उपचार, किशोरवयीन मुलींची तपासणी व सल्ला, बालरोग निदान व उपचार, मधुमेह, रक्तदाब, रक्तक्षय, मोतीबिंदू, कॅन्सर यांची तपासणी व सल्ला, रक्त तपासणी, क्षयरोग निदान व उपचार करण्यात येणार आहे. बालरोग तज्ज्ञ डॉ. रुचिका यादव, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सुरेखा आडनाईक, आर्थोपेडिक सर्जन डॉ. अशोक जाधव, जनरल सर्जन डॉ. आशा जाधव तसेच डॉ. दळवी हे रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत.