क्रीडा प्रशालेची पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रीडा प्रशालेची पाहणी
क्रीडा प्रशालेची पाहणी

क्रीडा प्रशालेची पाहणी

sakal_logo
By

03082
अनिवासी क्रीडा प्रशालेसाठी उपायुक्तांची पाहणी
कोल्हापूर, ता. १५ : महापालिकेच्या गुरुवर्य आबासो सासने विद्यामंदिर येथील अनिवासी क्रीडा प्रशालेची आज उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी दरेकर यांनी सुविधांची कामे तातडीने करण्याच्या सूचना केल्या.
प्राथमिक शिक्षण समितीने हा उपक्रम हाती घेतला असून, बालवयातील गुणवंत क्रीडापटूंना शोधून प्रशिक्षीत करणे व दर्जेदार खेळाडू तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी येथे पहिली अनिवासी क्रीडा प्रशाला करण्यात येणार आहे. तीन वर्षाच्या वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करुन प्रशिक्षण देणे, पौष्टिक अल्पोपहार, वाहतूक व्यवस्था, गणवेश, साहित्य, आरोग्य सेवा, विद्यार्थी अपघात विमा योजना, सुसज्ज मैदान आदी बाबी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. महापालिका शाळांमधील पाचवी ते सातवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ५० मुले व मुलींची पहिल्या टप्यासाठी निवड केली जाणार आहे. बास्केटबॉलसाठी १० मुले, १० मुली, रग्बीसाठी १० मुले, १० मुली, मैदान स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे