जुना बुधवार संघाचा विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुना बुधवार संघाचा विजय
जुना बुधवार संघाचा विजय

जुना बुधवार संघाचा विजय

sakal_logo
By

03095
कोल्हापूर : शाहू छत्रपती गोल्ड चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सोमवारी संयुक्त जुना बुधवार विरुद्ध रुटस्‌ फुटबॉल क्लब यांच्या सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

‘जुना बुधवार’ची उपांत्य फेरीत धडक
बंगळूरच्या रुटस्‌ एफ.सी.वर केली १-० ने मात

कोल्हापूर, ता. १५ : संदीप सिंगचे उत्कृष्ट गोलरक्षण व मोक्याच्या क्षणी रिचमंड अवेटी याने मारलेली पेनल्टी या जोरावर संयुक्त जुना बुधवार पेठ संघाने बंगळुरूच्या रुटस्‌ फुटबॉल क्लबवर १- ० अशी मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. शाहू छत्रपती गोल्ड कप अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेतील अखेरचा उपांत्यपूर्व सामना छत्रपती शाहू स्टेडियमवर झाला. तत्पूर्वी सामन्याचे उद्‍घाटन आमदार जयंत आसगावकर, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, सिद्धार्थ शहा यांच्या उपस्थितीत झाले.
उत्तम संघ बांधणी व नियोजनात्मक खेळाच्या जोरावर जुना बुधवारपेठ संघाने रुटस्‌ क्लबला रोखले. आक्रमक सुरुवात करणाऱ्या रुटस्‌ला लय सापडली नाही. शॉर्ट पासिंगचे अनेक प्रयत्न फसल्यामुळे जुना बुधवार संघाने सामन्यावर पकड मजबूत करण्यास सुरुवात केली. यातच जुना बुधवार कसून गोलसाठी झालेले आक्रमण परतण्याच्या प्रयत्नात असताना रुटस्‌च्या खेळाडूने धोकादायकरीत्या अडवल्यामुळे पंचानी जुना बुधवार संघाला ४० व्या मिनिटाला पेनल्टी बहाल केली. यावर रिचमंड अवेटी याने गोल नोंदवत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर पुनरागमनाचे प्रयत्न करण्याच्या प्रयत्नात रुटस्‌ संघाने आक्रमक चढाया केल्या; मात्र त्यात यश आले नाही. गौतम राजेश, शेलटोन निक्सन यांचे प्रयत्न फोल ठरले. याउलट जुना बुधवार संघाचा गोलरक्षक संदीप सिंग याने अनेक चढाया फोल ठरवल्या.
उत्तरार्धात रुटस्‌च्या गॉडवीन जॉन्सन, शाश्वत के. आर. यांनी चांगला खेळ करत गोल नोंदवण्याचा प्रयत्न केले; मात्र बुधवार संघाच्या मध्यफळी व बचावफळीने रुटस्‌चे हे सारे प्रयत्न फोल ठरवले. बुधवारच्या क्लॅरोने लुईस, सागर चिले, संकेत जरग यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. अखेरपर्यंत दोन्ही संघांना गोल नोंदवता आले नाहीत व एकमेव गोलच्या जोरावर जुना बुधवार संघाने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

आजचा सामना
संध्याकाळी ४ - श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ