
कसबा बावड्यात कुस्ती स्पर्धेचे आयोजन
03093
कसबा बावडा ः येथे छत्रपती संभाजीराजे उत्सव कमिटीतर्फे निकाली कुस्त्यांचे मैदान झाले.
कसबा बावड्यात
निकाली कुस्त्यांचे मैदान
कोल्हापूर, ता. १५ : कसबा बावडा येथील छत्रपती संभाजीराजे उत्सव कमिटीतर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आज निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन केले होते. जिल्हा व शहर तालीम संघाच्या मान्यतेने या स्पर्धा घेतल्या. श्री दत्त मंदिराच्या पटांगणावर कुस्ती स्पर्धा घेतल्या. आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. स्पर्धेसाठी जिल्ह्यातून नामांकित तालमीतील प्रत्येक वजन गटातील मल्लांची उपस्थिती होती. कसबा बावड्यामध्ये तब्बल १५ वर्षांनी या भव्य कुस्ती स्पर्धा भरविल्या होत्या. दरम्यान, सन्माननिय कुस्तीत भैरु माने विरुद्ध ‘शाहुपूरी’चा लिंगराज होमनाने तर बबलु चौगले विरुद्ध गंगावेश तालमीचा ऋतुराज मासाळ विजय झाला.
पहिल्या दोन मोठ्या कुस्ता बाबासो दळवी आणि बापूसो दळवी यांच्या स्मरणार्थ विशाल दळवी यांच्याकडून दोन चांदीच्या गदा भेट दिल्यानंतर इतर प्रत्येक स्पर्धकांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह दिले. याप्रसंगी कसबा बावड्यातील सर्व जुन्या वरिष्ठ मल्लांचा सत्कार करण्यात आला.
दिपक वरपे यांनी निवेदन केले. सुभाष पाटील, अनिल चव्हाण यांचे सहकार्य लाभले. अर्थव चौगले, अशोक कुचकोरवी, रविंद्र बेळगी, सुरज निकम, संदीप पाटील, उदय देसाई, संभाजी हराळे, इंद्रजित पाटील, गजानन बेडेकर, सचिन चौगले, शैलेश पाटील, बाजीराव पडळकर, अभी माने, रणजिसिंह उलपे, श्रीधर पाटील, अजिज शेख प्रमुख उपस्थित होते.