आजरा ः हंदेवाडी कार्यक्रम बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः  हंदेवाडी कार्यक्रम बातमी
आजरा ः हंदेवाडी कार्यक्रम बातमी

आजरा ः हंदेवाडी कार्यक्रम बातमी

sakal_logo
By

हंदेवाडी गावच्या विकासासाठी कटिबध्द ःराजेश पाटील
आजरा, ता. १५ ः ‘हंदेवाडी (ता.आजरा) या गावच्या विकासासाठी वेळोवेळी योगदान देण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो. या गावाच्या विकासासाठी कटिबध्द आहे,’ असे प्रतिपादन चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी केले.
येथील सांस्कृतिक सभागृह व मंदिर परिसर सुशोभीकरण शुभारंभ आमदार पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होतो. माजी प्राचार्य एम. डी. कदम अध्यक्षस्थानी होते. आमदार पाटील म्हणाले, ‘गावातील विकास कामांसाठी ब्रम्हा विकास मंडळ मुंबई यांचे वेळोवेळी योगदान लाभत आहे. मंडळाचे काम कौतुकास्पद आहे. व्यावसायिक स्व. भैरू आप्पा जाधव यांच्या स्मृप्रित्यर्थ त्यांचे सुपुत्र अरुण भैरू जाधव व परिवार यांनी गावच्या वेशीवर स्वागत कमानी बांधली हे चांगले काम आहे.’ ब्रम्हा विकास मंडळ मुंबईचे आनंदराव मटकर म्हणाले, ‘ब्रम्हा विकास मंडळाने सांस्कृतिक सभागृहाला चार लाखांचा निधी दिला आहे.’ तालुका संघाचे नूतन संचालक अल्बर्ट डिसोझा , माजी प्राचार्य कदम यांचेही भाषण झाले. यावेळी गडहिंग्लज कृषी उत्पन्न समितीचे माजी अध्यक्ष अभय देसाई, ब्रम्ह हनुमान चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर हेबाळकर ,पोलिस पाटील पुंडलिक फडके, शिवाजी बामणे, महादेव फडके,रवींद्र पटेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. जनार्दन बामणे यांनी प्रास्ताविक केले. एन. डी. रेडेकर यांनी आभार मानले.