पाण्यातील मोटार चोरट्यांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाण्यातील मोटार चोरट्यांना अटक
पाण्यातील मोटार चोरट्यांना अटक

पाण्यातील मोटार चोरट्यांना अटक

sakal_logo
By

आरोपीअचा फोटो आहे.
-------------------

पाण्याचे मोटरपंप चोरणाऱ्या
सहा जणांना अटक

३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त ः सर्व संशयित आरोपी म्हालसवडेचे

कोल्हापूर, ता. १५ ः नदी काठावरील व विहिरीतील पाण्याचे मोटरपंप सेटची चोरी करणाऱ्यांना सहा जणांना करवीर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ४ पाण्याचे मोटर पंपसेट, मोटार व दोन मोटारसायकली असा एकूण ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता उद्या (ता. १६) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी दिली.
अटक केलेल्यांची नावे अशी ः राहुल अर्जुन पाटील (वय ३१, रा. ग्रामपंचायत जवळ), ऋषिकेश लक्ष्मण पाटील (२४, रा. तळ्याजवळ), विनायक मारुती पाटील (३४, रा. इंदिरानगर), दीपक भिवाजी निकम (२३, रा. शाळेजवळ), गणेश पांडुरंग पाटील (२५, रा. चिरका) आणि सम्राट सरदार पाटील (२४, रा. वरचीवाडी, सर्वजण रा. म्हासलवडे, ता. करवीर)
पोलिसांनी सांगितले की, करवीर पोलिस ठाणे हद्दीतील म्हासलवडे, सडोली दुमाला व घुगुरवाडी या परिसरात नदीकाठच्या व विहिरीमधील पाण्याच्या मोटरपंप सेट चोरीस गेल्या आहेत. त्याचा शोध पोलिसांकडून सुरू होता. याचदरम्यान निरीक्षक काळे यांना म्हालसवडे गावातून ५ ते ६ दिवसांपूर्वी चोरीस गेलेला विहिरीमधील बोअरवेलची मोटरपंप सेट घेऊन काही व्यक्ती चेरी रंगाच्या मोटारीतून विक्री करण्यासाठी म्हालसवडे ते भाटणवाडी रोडने जाणार आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार आलेली मोटार थांबविण्यात आली. मोटारीत ६ जण होते. त्यांना उतरवून झडती घेतली असता सीटच्या पायाखाली पांढऱ्या रंगाचे प्लास्टिकचे पोते दिसले. त्यामध्ये बोअरवेलची मोटर व तिची केबल होती. बोअरवेलच्या मोटरीबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कसून चौकशी केली असता सर्वांनी एकत्र मिळून येऊन हालसवडे गावातील शेतातून बोअरवेलची मोटर चोरी केली असल्याची कबुली दिली.
-----