
आजरा ः पोलीस वृत्त
आजऱ्यात किरकोळ कारणावरून मारामारी
चौघे जखमी; पंधरा जणांवर गुन्हा दाखल
आजरा, ता. १५ ः येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादीचे पर्यवसान मारामारीत होऊन यामध्ये चौघेजण जखमी झाले. आजरा पोलिसांत याप्रकरणी राहील अस्लम खेडेकर व अल्ताफ सादिक सिराज यांनी परस्पर फिर्याद दिली आहे. यावरून पंधरा जणांवर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहीती अशी, मॉफिस खेडेकर व सादिक रहीमबक्ष सिराज (दोघे रा. आमराई गल्ली) यांच्यामध्ये किरकोळ वादावादी झाली. कृषी चिकित्सालयानजीक सुरू झालेली ही वादावादी आजरा येथील संभाजी चौकात येईपर्यंत सुरूच होती. संभाजी चौकात त्या दोघांच्याही समर्थकांनी यामध्ये भाग घेतल्याने याचे रूपांतर मारामारीत झाले. या मारामारीमध्ये मॉफिस खेडेकर, राहील खेडेकर, अल्ताफ सिराज(सर्व रा. आमराई गल्ली, आजरा) व मोहसीन शौकत लष्करे (रा.गांधीनगर, आजरा) असे चौघेजण जखमी झाले.
याप्रकरणी राहील खेडेकर, तौसिफ खेडेकर, आशिष खेडेकर, मॉफिस खेडेकर, अमित खेडेकर, इलियास मुल्ला, गुड्डू सलीम खेडेकर, मोहसीन लष्करे, आफताब सादिक सिराज, इरफान रहीमबक्ष सिराज, ताहीर तकिलदार, सादिक रहीमबक्ष सिराज, आरिफ मोहम्मद शिराज, शकील शिराज, मंजूर मुजावर यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संतोष घस्ती पुढील तपास करीत आहेत.