मालगाडीत चालवत असताना बांद्यात चालकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालगाडीत चालवत असताना
बांद्यात चालकाचा मृत्यू
मालगाडीत चालवत असताना बांद्यात चालकाचा मृत्यू

मालगाडीत चालवत असताना बांद्यात चालकाचा मृत्यू

sakal_logo
By

३०९१
बांदा ः तपासणी नाका येथे याच कॅन्टरमध्ये चालक मृतावस्थेत आढळला.

मालगाडीत चालवत असताना
बांद्यात चालकाचा मृत्यू
हृदयविकाराचा झटका; तपासणी नाक्याजवळ घटना
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १५ ः मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली पोलिस तपासणी नाका येथे कॅन्टर चालकाचा धावत्या गाडीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी उशिरा घडली. सचिन संभाजी भोईटे (वय ४८, रा. तळवडे, जि. सातारा) असे त्यांचे नाव आहे. बांदा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह विच्छेदनासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः भोईटे कॅन्टर घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने खासगी कंपनीची मालवाहतूक करत होते. आज सकाळी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांनी सावंतवाडी शहरातील खासगी दवाखान्यात उपचार केले. दुपारी त्यांना बरे वाटू लागल्याने ते पुन्हा गोव्याच्या दिशेने मार्गस्थ झाले. सायंकाळी पाचच्या सुमारास ते ट्रकसह इन्सुली पोलिस तपासणी नाका येथे आले; मात्र बराच वेळ ट्रक तेथेच उभा होता. भोईटे मोबाईल उचलत नसल्याने गोव्यातून खासगी मालवाहतूक कंपनीची माणसे त्यांच्या शोधात बांदा येथे आली. त्यांना इन्सुली तपासणी नाका येथे कॅन्टर उभा असलेल्या स्थितीत आढळला. याबाबत त्यांनी तपासणी नाक्यावरील पोलिस कर्मचाऱ्यांना कल्पना दिली. कॅन्टरचा दरवाजा उघडून पाहिले असता चालक भोईटे मृतावस्थेत आढळले. त्यांची गाडी मात्र सुरूच होती. या घटनेची बांदा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.