पोलिस वृत्त एकत्रित

पोलिस वृत्त एकत्रित

आठवडी बाजारातून आयफोनची चोरी

कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील रविवारच्या आठवडी बाजारात भाजी खरेदी करताना शर्टच्या खिशातील सुमारे ३५ हजार रुपयांचा आयफोन चोरट्याने लंपास केला. याची फिर्याद हरीओम नगरातील संजय कृष्णराव साळवी यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली. रविवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास ही घटना झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
.......

संभाजीनगर येथे तरुणास मारहाण

कोल्हापूर : संभाजीनगर येथे मध्यरात्री एका तरुणाला दोघा-तिघांना बेदम मारहाण केली. ओंकार रामचंद्र पाटील (वय २७, रा. गिरगाव, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. मारहाणीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
---

बोंद्रेनगर येथे दोघांना मारहाण

कोल्हापूर : बोंद्रेनगरातील बालावधूत मंदिराजवळ रविवारी सायंकाळी आठ जणांनी दोघांना मारहाण केली. आकाश तानाजी कोकीतकर (वय २२) आणि अमिकेत मधुकर मांगले (वय २६, दोघे रा. साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत. दोघांवर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com