निसर्गाने आखून दिलेला रूपरेषा ओलांडल्यास मानवी जीवन धोक्यात

निसर्गाने आखून दिलेला रूपरेषा ओलांडल्यास मानवी जीवन धोक्यात

फोटो-03106
......

निसर्गाने आखून दिलेली रूपरेषा
ओलांडल्यास जीवन धोक्यात

डॉ. जय सामंत; शिवाजी विद्यापीठात ‘पर्यावरण संवाद’ विषयावर कार्यशाळा

कोल्हापूर,ता. १५ ः ‘पर्यावरणाच्या साखळीत माणूस हा शेवटचा घटक असूनही आपण निसर्गाच्या विरोधात जाऊन निसर्गाने आखून दिलेली रूपरेषा ओलांडत आहोत. त्यामुळे येणाऱ्या काळात मानवाचे भवितव्य धोक्यात आहे. यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणाच्या जागतिक परिषदांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे, मार्गदर्शक तत्वे लक्षात घेऊन प्रत्येक राष्ट्राने पर्यावरणविषयक जबाबदाऱ्यांबाबातही एकनिष्ठ राहिले पाहिजे’, असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ प्रा. डॉ. जय सामंत यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठातील जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन विभागातर्फे मानव्यशास्त्र सभागृहात आयोजित ‘पर्यावरण संवाद’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. ‘शास्त्रज्ञांनी नवनवीन शोध लावले. त्यामुळे मानवी जीवन सुलभ झाले असले, तरी भौतिक सुखाच्या हव्यासापोटी साधने हळूहळू संपत चालली आहेत. त्यामुळे प्राथमिक गरजांचे संवर्धन करणे म्हणजे पर्यावरणाचे संवर्धन करणे असल्याचे प्रभारी कुलगुरू डॉ. विलास शिंदे यांनी सांगितले. विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. आसावरी जाधव यांनी ‘पर्यावरण आणि माध्यमे’ याविषयावर मार्गदर्शन केले. पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड यांनी पर्यावरणविषयक भारतातील चळवळींबाबत मार्गदर्शन केले. पर्यावरण संवर्धन ही सर्वांची जबाबदारी असून याबाबत समाजात जागृती करणे गरजेचे असते. यासाठी पर्यावरण चळवळी महत्वाच्या ठरतात, असे त्यांनी सांगितले. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी एसयुके रिसर्च व डेव्हलपमेंट फौंडेशनचे सीइओ डॉ. पी. डी. राऊत यांनी माध्यमातील पर्यावरण विषयक आशय आणि समस्या यावर मार्गदर्शन केले.
जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन अधिविभाग प्रमुख प्रा. डॉ निशा पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. परशराम पवार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुमेधा साळुंखे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com