डीकेटीई ‘वायसीपी’च्या २० विद्यार्थ्यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीकेटीई ‘वायसीपी’च्या २० विद्यार्थ्यांची निवड
डीकेटीई ‘वायसीपी’च्या २० विद्यार्थ्यांची निवड

डीकेटीई ‘वायसीपी’च्या २० विद्यार्थ्यांची निवड

sakal_logo
By

ich161.jpg
03114
इचलकरंजी ः डिकेटीईच्या ‘वायसीपी’च्या २० विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड झाली आहे.

डीकेटीई ‘वायसीपी’च्या २० विद्यार्थ्यांची निवड

इचलकरंजी, ता. १५ ः येथील डीकेटीई सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण पॉलीटेक्निकच्या २० विद्यार्थ्यांची ऍप्टीव काम्पोनंट (पुणे) या नामांकित कंपनीत ५.७५ लाख रुपये पॅकेजवर निवड केली आहे.
ऍप्टीव काम्पोनंट कंपनीतर्फे नुकताच कॅम्पस इंटरव्हयू आयोजित केला होता. त्यामधून या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ऍप्टीव काम्पोनंट ही आंतरराष्ट्रीय नामांकित सॉप्टवेअर कंपनी आहे. जगभरातील ४८ देशामध्ये सॉप्टवेअर डेव्हलपमेंट, सॉप्टवेअर टेस्टींग सेवा आणि तंत्रज्ञान तसेच व्यवस्थापन यासारख्या सेवा पुरवते. निवड झालेले विद्यार्थी असे, योगेश नंदीकुरळे, भाग्यश्री कोपार्डेकर, उत्कर्ष खुडे, श्‍वेता मेहरकर, वैष्णवी ताडे, दिपक पुजारी, मयुरी पन्हाळकर, यशराज पाटील, निहाल शेख, अमन जमादार, यश दबडे, वैभव सर्युवंशी, इशा लोहार, आकाश अलुरे, मोयीन नायकवडे, सर्वजीत नर्मदे, राहूल पोईपकर, सौरभ सुर्यवंशी, अवधूत जाधव व श्रुती पाटील. कॅम्पस इंटरव्हयू प्रोसेसमध्ये टेक्निकल राउंड, ऍप्टीटयूड टेस्ट, तसेच पर्सनल एच आर इंटरव्हयू इत्यादी फेऱ्या घेण्यात आल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांची निवड झाली. यशाबद्दल डीकेटीई संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे आदिंनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना वायसीपीचे प्राचार्य ए. पी. कोथळी, उपप्राचार्य बी. ए. टारे, टीपीओ प्रा. एम. बी. चौगुले, डीकेटीईच्या प्रभारी संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे आदींचे मार्गदर्शन लाभले.