Fri, Sept 22, 2023

रिपब्लिकन पार्टीतर्फे उपोषण
रिपब्लिकन पार्टीतर्फे उपोषण
Published on : 16 May 2023, 11:54 am
ich162.jpg
03139
इचलकरंजी : रिपब्लिकन पार्टीतर्फे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
-----------------
रिपब्लिकन पार्टीतर्फे उपोषण
इचलकरंजी : कोल्हाटी डोंबारी समाजातर्फे स्मशानभूमीस गेट व शेड बसवण्यात यावे. तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, लाखेनगर, जाधव मळा, लालनगर व परिसर भागातील सर्व्हे करून घरफाळा लागू करावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सभागृहचे काम कुशल कारागिराकडून करावी, यासह अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे महापालिकेसमोर उपोषण करून निवेदन दिले. उपआयुक्त केतन गुजर यांनी पंधरा दिवसामध्ये मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रदिप कांबळे, सुनिल कुडाळकर, चंद्रकांत कुडाळकर, भारत लाखे, संजय कुडाळकर, अरूण जावळे, राहूल कुडाळकर, नारायण जावळे, राहूल जावळे आदी उपस्थित होते.