फुल बाजार ग्राऊंड रिपोर्ट

फुल बाजार ग्राऊंड रिपोर्ट

लोगो - ग्राऊंड रिपोर्ट
------
फोटो चांगला वापरा 03226
........
फुले कोमेजलेलीच...
--
गुढी पाडव्याला मिळाला चांगला भाव; त्यानंतर दराने गाठला तळ

-नंदिनी नरेवाडी
उन्हं एवढं वाढलंय... फुले कोमजायला लागलीत... त्यात गिऱ्हाईक नाही... त्यामुळे फुलांना दरही मिळेना... त्यामुळे शेतातील फुलांची बाग पूर्ण कोमेजल्या बगा... अशा शब्दांत शिंगोशी मार्केटमध्ये झेंडूविक्रीसाठी आलेल्या महादेव घाटगे यांनी व्यथा मांडली. गुढी पाडव्याला फुलांना चांगला भाव मिळाला. त्यानंतर मात्र दराने तळ गाठला. सध्या उन्हाचा कडाका वाढतोय... फुलांवर डाग पडतायेत. सण नाहीत त्यामुळे सध्या भाव नाही. आता थोड्या दिवसांत बाग काढू व पुन्हा नव्याने बाग लावू... म्हणजे श्रावणापासून ही बाग फुलेल आणि गौरी - गणपती, दसरा - दिवाळीत फुलांना भाव मिळेल आणि आमच्याही चेहऱ्यावर हास्य फुलेल, असा आशावादही शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

झेंडूचे पोते, मोगऱ्याचे गजरे
सकाळी सहाची वेळ. शिंगोशी मार्केटमध्ये मोटरसायकलवरून पोती भरून फुले घेऊन शेतकरी प्रवेश करत होते. काही फुलांचे व्यावसायिक आधीच आले आहे. शेतकरी आले की त्यांचा माल पाहून भाव ठरवत होते. सुरूवातीला एक शेतकऱ्याने पिवळा आणि भगव्या झेंडूचे पोते उघडले. झेंडूची गुणवत्ता पाहताच भगव्या झेंडूचे पोतेच एका व्यावसायिकाने उचलले. झेंडूला किलोचा ३० रूपये भाव मिळाला. पिवळ्या झेंडूचे पोते घेऊन शेतकरी ग्राहकाची वाट पाहू लागला. कोणी एक किलो, दोन किलो, पाच किलो अशा प्रमाणात हळूहळू पोते हलू लागले. तोवर मोगऱ्याचा सुवास मार्केटभर पसरला. एका छोट्याश्या गाड्यावर बंगळूरवरून आणलेले मोगऱ्याचे गजरे लावले जाऊ लागले. तोवर परिसरात असलेल्या गजरेवाल्यांनी गाड्यावर गराडा घातला. अवघ्या दहा - पंधरा मिनिटांत त्याचे गजरे विकले गेले.

सुगंधाने फुलले शिगोंशी मार्केट

डच, जर्बेरा, शेवंती, भगवा - पिवळा झेंडू, गुलाब, विविध रंगातील शेवंती, मोगरा, चाफा, लिली, कमळे अशा नानाविध फुलांच्या सुगंधाने शिगोंशी मार्केट फुलुन गेले. त्याचवेळी खेड्यातील हिरव्या रंगाची नऊवारी नेसलेल्या महिला दुर्वा, आंबेरी, बेल, तुळस असे पूजेसाठी लागणारे इतर साहित्य घेऊन येऊ लागल्या. मोक्याची जागा शोधून तिथे आपले सामान व्यवस्थितरित्या मांडू लागल्या. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिला, पुरूषांनी दुर्वा, बेल, तुळस घेत तिचा भार हलका केला.

चौकट
‘दरातील चढ-उतार चालायचेच’
कळ्याचे शिवाजी पाटील यांनी पांढरी शेवंती लावण्यास सुरू केली. सध्या शेवंतीचा १२० रूपये भाव सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. उन्हामुळे शेवंतीला डाग पडतात त्यामुळे म्हणावा तसा भाव मिळत नाही. मात्र, सणासुदीला चांगला भाव मिळतो, त्यामुळे एकदा कमी दर एकदा जास्त दर, असे चालायचेच, अशा शब्दांत त्यांनी मार्केटची कहानीच सांगितली.
--------
चौकट
‘शेतकरी हा शेतकरीच असतोय’
दरम्यान, एक महिला रिक्षातून मार्केटमध्ये प्रवेशती झाली. तिने झेंडू असलेल्या शेतकऱ्यासमोर रिक्षा थांबवायला सांगितली. यावेळी मार्केट अजून फारसे भरले नव्हते. त्यामुळे ‘त्या’ एकाच शेतकऱ्याकडे झेंडू उपलब्ध होता. पिवळ्या झेंडूचा ३५ रूपये किलो दर केला. यावेळी आम्ही पहाटे साडेतीन वाजता झेंडू खुडलाय, त्याची तरी मजूरी निघू दे, अशी विनवणी केली. मात्र, त्या महिलेने त्याकडे लक्ष न देता भगव्या झेंडूच्या दराबाबत व्यावसायिकाकडे तिने चौकशी केली. व्यावसायिकाने २० रूपये पावशेर झेंडूचा दर सांगितला. त्यावेळी मात्र ‘त्या’ शेतकऱ्याने ‘अहो ताई, शेतकरी हा शेतकरीच असतोय...’ असे म्हणत शेतकऱ्याच्या उदार मनाची जाणीव करून दिली.
----
कोट
माझी गुलाबाची बाग आहे. आदल्या दिवशी आम्ही फुले तोडतो. दुसऱ्या दिवशी ही फुले घेऊन मार्केटमध्ये घेऊन येतो. गुलाबाच्या शेकड्यावर भाव ठरतो. गुलाब लगेच कोमेजत नसल्याने तेवढे नुकसान होत नाही.
-प्रकाश माने, गणेशवाडी
......
कोट
दिवसभर मी रानात फिरून आंबेरी, गणपतीच्या छोट्या-मोठ्या मूर्तीला बसतील अशा दुर्वा निवडून, बेल तोडून, तुळस खुडतो. यासाठी उन्हाची पर्वा करत नाही. सकाळी लवकर उठून मार्केटमध्ये येतो. १० रूपयांना एक जुडी विकतो, जास्त अपेक्षा करत नाही. याच्याच विक्रीतून माझी रोजीरोटी चालते.
-आनंदी कांबळे, खुपीरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com