धोकादायक व्हॉल्व्हची दुरुस्ती सुरू

धोकादायक व्हॉल्व्हची दुरुस्ती सुरू

01563
लोगो ः सकाळ बातमीचा परिणाम वापरणे
---------
ich165.jpg
03213
इचलकरंजी : महापालिकेमार्फत शहरातील रस्त्याबाहेर आलेल्या व्हॉल्व्हच्या बाजूने भर घालण्यात येत आहे.
------
धोकादायक व्हॉल्व्हची दुरुस्ती सुरू
इचलकरंजी महापालिकेकडून कार्यवाही; शहरवासियांमधून समाधान
इचलकरंजी, ता. १६ : शहराला पाणी पुरवठा करणारे पाईपलाईनचे व्हॉल्व्ह हे मुख्य मार्गाच्या मधोमध आल्याने वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहेत. या आशयाची बातमी ‘सकाळ’ मधून प्रसिद्ध केली होती. याची दाखल घेत महापालिका प्रशासनाने शहरातील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्‍या व्हॉल्व्हची दुरूस्ती सुरू केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात अपघातांना आळा बसणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. ‘सकाळ’ ने या समस्येकडे लक्ष वेधल्याने शहरवासियांमधून आभार व्यक्त करण्यात येत आहे.
इचलकरंजी शहरात अधिकृत नळ कनेक्शन सुमारे ४३ हजारहून अधिक आहेत. त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी ४, ६, ८, १२ इंची पाइपांचे जाळे जमिनीखाली विस्तारले आहे. विशिष्ट भागास ठरलेल्या वेळी पाणी योग्य दाबाने पाणी पुरवठा होण्यासाठी विविध आकाराचे व्हॉल्व्ह बसवले आहेत. यातील अनेक व्हॉल्व्ह हे १९६५ पूर्वीचे आहेत. त्यांची वेळोवेळी देखभाल दुरूस्ती न झाल्याने ते अत्यंत खराब झाले आहेत. काही कालामानाने सडले आहेत. त्यामुळे त्या भागात पाणी सोडण्यात येते. त्यावेळी त्यामधून पाणी गळती होते. तसेच पूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांची रूंदीही जेमतेम होती. यावेळी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी केलेल्या पाईपलाइन व व्हॉल्व्ह आज रस्त्यांच्या मधोमध आल्या आहेत. व्हॉल्व्ह आलेल्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या समस्येकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधले होते. त्याची दाखल घेत खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
---------
व्हॉल्व्ह रस्त्याकडेला घेणे गरजेचे
सध्या व्हॉल्व्हलगत असलेले खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. मात्र अनेक व्हॉल्व्ह रस्त्याच्या मधोमध आहेत. त्यामुळे प्रत्येकवेळी पाणी सोडताना वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. हे व्हॉल्व्ह रस्त्याच्या कडेला घेणे गरजेचे आहे, जेणेकरून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com