
घरफाळा भरणा
सहा टक्के सवलत
योजनेत १०५७१
करदात्यांनी भरला कर
कोल्हापूर, ता. १६ : महापालिकेच्या घरफाळा विभागाने नवीन करासाठी ३१ जूनअखेर दिलेल्या ६ टक्के सवलत योजनेचा १०५७१ करदात्यांनी लाभ घेतला आहे. पोस्टामार्फत १ लाख ५७ हजार ५४७ मिळकतींची बिले छपाई करून वितरीत करण्याची कार्यवाही सुरू आहे.
घरफाळा विभागाकडून यंदाचा कर एकरकमी भरणा करणाऱ्या १०, ५७१ मिळकतधारकांनी १ एप्रिल ते १६ मेअखेर ४ कोटी १३ लाख ८५ हजार सातशे रूपयांचा भरणा केला आहे. ४४५६ करदात्यांनी गुगल पे, फोन पे व इतर युपीआय वॉलेट सुविधेचा लाभ घेतला आहे.
घरफाळा बिले पोस्टाने घरी पोहचण्यास विलंब झाल्यास मिळकतधारकांनी जुने बिल, भरणा पावती किंवा मिळकत करदाता क्रमांक सांगून नागरी सुविधा केंद्रात वा वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने घरफाळा भरून ६ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.