आरोग्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य शिबिर
आरोग्य शिबिर

आरोग्य शिबिर

sakal_logo
By

03241

आपला दवाखान्याच्या शिबिरात
२४२ रुग्णांची तपासणी

कोल्हापूर, ता. १६ : बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात २४२ रुग्णांनी लाभ घेतला. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीही करण्यात आली.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, कुटुंब कल्याण केंद्र क्र.५ यांच्यावतीने पितळी गणपती शिबिराचे आयोजन केले होते. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. मेडिसीन विभाग ४६, अस्थिव्यंग विभाग २७, बाल विभाग २५, स्त्री रोग विभाग २२, जनरल सर्जरी १०, नेत्ररोग विभाग ४५, फुफ्फुसाचे एक्स-रे १०, रक्तदाब २३, मधूमेह ३४ रुग्णांची तपासणी झाली.
डॉ. पुलकित खंबायते, डॉ. सुनिता पाटील, डॉ. रुचिका यादव, डॉ. मंदार पाटील, डॉ. सुरेखा आडनाईक, डॉ. आशा जाधव, डॉ. अशोक जाधव, डॉ. रुपाली दळवी आदींनी तपासणी केली. तसेच मोफत तपासणी, मोफत औषधोपचारही करण्यात आले. यावेळी उपायुक्त रविकांत आडसूळ, आरोग्याधिकारी डॉ. रमेश जाधव, डॉ. प्रकाश पावरा, डॉ. विद्या काळे- हेरवाडे, डॉ.अमोलकुमार माने उपस्थित होते.