हरपवडेत रासूबाई मंदिराचा जीर्णोद्धार

हरपवडेत रासूबाई मंदिराचा जीर्णोद्धार

हरपवडेत रासूबाई मंदिराचा जीर्णोद्धार
आजरा, ता. १६ ः हरपवडे (ता. आजरा) येथे श्री रासूबाई मंदिर जीर्णोद्धार व वास्तुशांती सोहळा उत्साहात झाला.
देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या अधिपत्याखाली श्री रासूबाई देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती, रासाई देवी ग्रामविकास सेवा प्रतिष्ठान आणि हरपवडे ग्रामस्थांतर्फे आयोजन केले होते. रामनाथगिरी समाधी मठ, कसबा नुलचे मठाधीपती भगवानगिरी महाराज व आर. वाय. पाटील यांच्याहस्ते कलशारोहण झाले. मुकुंदराव देसाई, सुधीर देसाई, अशोक चराटी, उदयराज पवार, दौलती पाटील प्रमुख उपस्थित होते. श्री रासूबाई देवस्थानचे अध्यक्ष संजय हळवणकर, सचिव श्रावण धाटोबे, संचालक बाबासो पाटील, राजाराम पाटील, दत्तात्रय पोवार, धनाजी सावंत, जयराम कांबळे, आनंदा हळवणकर, रामराव जाधव, एकनाथ सुतार, बाळू केळुसकर, सागर तिपे, सुरेश पाटील, धनाजी पाटील आदींच्या मदतीने कार्यक्रम झाला. रासूबाई देवस्थान मंडळ हरपवडेचे सचिव व श्री रासाई देवी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्रावण धाटोबे स्वागत केले. धनाजी सावंत यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com