
युवकास सक्तमजुरी
०३२०८ - गौरव कांबळे
बलात्कार करणाऱ्यास
दहा वर्षे सक्तमजुरी
आरोपी रणमळ्यातील; ३० हजाराचा दंडही
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरुणास आज दहा वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावण्यात आली. त्याचवेळी धमकी दिल्याबद्दल दोन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्रित भोगण्याचे आदेशात म्हटले आहे. दंडाची संपूर्ण रक्कम पीडितेस देण्याचेही आदेश आहेत. गौरव सतीश कांबळे (वय २७, रा. न्यू पॅलेसजवळ, मुख्य पोस्ट कार्यालयाजवळ, रमणमळा) असे आरोपीचे नाव आहे. जादासह जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी ही शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकील सौ. अमिता ए. कुलकर्णी यांनी काम पाहिले.
फेब्रुवारी ते मार्च २०१७ चे दरम्यान गुन्हा घडला होता. त्याने संबंधित मुलीला ‘तू कोणाला काही एक सांगितलेस तर तुझ्यासह, आई-वडील भावास ठार मारेन’ अशी धमकी त्याने दिली होती. संबंधित अल्पवयीन असून, गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा व इतर कलमांनुसार गुन्हा नोंदवून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाले. ॲड. कुलकर्णी यांनी एकूण आठ साक्षीदार तपासले. फिर्यादी, पीडित मुलगी व इतर साक्षीदारांच्या जबाब आणि दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने शिक्षा सुनावली. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक टी. जी. देशमुख, पैरवी अधिकारी सुरेश परीट व पोक्सो पैरवी अधिकारी महिला हवालदार माधवी संजय घोडके यांनी सहकार्य केले.