
एसआयएलसी स्थानिक
लोगो - एसआयआयएलसी
पॅकेजिंग व्यवसायाचे मिळवा मार्गदर्शन
शनिवारी कोल्हापुरात कार्यशाळा, नवीन उद्योजकांसाठी फायदेशीर
कोल्हापूर, ता. १६ : आजकाल पॅकेजिंग केलेल्या वस्तूंनाच ग्राहक पसंती देतात. मार्केटमध्ये हजारो प्रॉडक्टस असून त्यांना पॅकेजिंग करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मटेरिअल वापरावे लागते. हे पाहता हा व्यवसाय करण्यास मुबलक संधी आहेत. पॅकेजिंगसाठी वापरावयाचे मटेरियल, पॅकेजिंग कशा प्रकारचे असावे, अद्ययावत प्रकार, फायदे, फळे, भाज्या व दुधासाठी प्लास्टिक, क्रेट पॅकेजिंग आदी विषयी तसेच हा व्यवसाय कसा सुरू करावा याबाबत सखोल मार्गदर्शन करणारी एकदिवसीय विशेष कार्यशाळा शनिवारी (ता. २०) सकाळ ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसीतर्फे ‘सकाळ’ कोल्हापूर कार्यालयात आयोजिली आहे.
कार्यशाळेत पॅकिंग मटेरिअल कसे बनवितात, त्यासाठी कोणत्या मशिनरी लागतात, छोटे पॅकेजिंग युनिट सुरू करण्यासाठी अंदाजे किती गुंतवणूक करावी लागते आदींविषयी मुंबईहून पॅकेजिंग क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ व ॲग्रोवनचे लेखक शैलेश जयवंत हे मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. ज्यांना पॅकेजिंगमध्ये ‘स्टार्ट अप’ करायचे आहे. तसेच, पॅकेजिंग युनिट असून त्यांना यातील अद्ययावत तंत्रज्ञान जाणून घ्यावयाचे आहे यासाठी कार्यशाळा फायदेशीर आहे.
पॅकेजिंग का महत्त्वाचे?
उत्पादनांना चांगले मार्केट मिळण्यासाठी
ग्राहकांची गरज ओळखून पॅकिंग
आकर्षक पॅकिंगमुळे व्यवसायात वाढ
कार्यशाळा ः ता. २० मे २०२३
प्रतिव्यक्ती १५०० रुपये शुल्क आहे.
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ९१७५७ २४३९९