आजरा ः बैठक बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः बैठक बातमी
आजरा ः बैठक बातमी

आजरा ः बैठक बातमी

sakal_logo
By

आजऱ्यात सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याबाबत बैठक

आजराः शहरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याबाबत नगरपंचायत प्रशासन व व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यामध्ये बैठक झाली. अनुचित प्रकारासह चोऱ्या, घरफोडी यासह विविध गुन्हे रोखण्यासाठी आजरा शहराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटिव्ही कॅमेरे गरजेचे असल्याचे या वेळी सांगण्यात आले. यासाठी आवश्यक निधी कशा पध्दतीने उभारता येईल यावरही चर्चा झाली. येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आजरा तहसीलदार कार्यालयालयाच्या सभागृहात बैठक झाली. नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, तहसीलदार समीर माने, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल हारुगडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर नलवडे आदी प्रमुख उपस्थित होते. आजरा शहरात सध्या अनुचित प्रकार घडत आहेत. त्यामुळे आजरा शहरातील सुरक्षितता धोक्यात आली आहे. सोशलमिडीयावरील मेसजसह अन्य कारणांच्यामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण बनत आहेत. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी शहरातील चौकाचौकात, मुख्य बाजारपेठ व अन्य महत्वाच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे. त्यामुळे असे प्रकार रोखणे व त्यांना आळा घालणे शक्य आहे, असे पोलिस प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी नगरसेवक, नगरपंचायतीमधील प्रशासकीय अधिकारी, व्यापारी असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. अनिल तराळ यांनी आभार मानले.