प्रशासक पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासक पाहणी
प्रशासक पाहणी

प्रशासक पाहणी

sakal_logo
By

03257

हॉकी स्टेडियमच्या कामांची
प्रशासकांनी केली पाहणी

कोल्हापूर, ता. १६ : मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडिअम येथे केंद्र शासनाच्या खेलो इंडिया योजनेअंतर्गत सुरू असलेले ॲस्ट्रोटर्फचे काम ९५ टक्के झाले आहे. त्याची प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी पाहणी केली. ठेकेदाराने लवकर पूर्तता करावी असे आदेश प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.
स्टेडियमची अनुषंगीक कामे, बोर्ड, रंगरंगोटी, लॅन्डस्केपींग, प्रवेशद्वाराच्या ठिकाणी भित्तीशिल्प, पुतळे करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना प्रशासकांनी शहर अभियंत्यांना दिल्या. शेजारील हॉस्टेलसाठी मागणी केलेली जागा ताब्यात घेण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा असे नगररचना विभागास सांगितले. गाळे लिलावाद्वारे देण्याची प्रक्रिया तातडीने करण्याचे आदेशही इस्टेट अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर महावीर उद्यान व हुतात्मा उद्यान येथील कामांची पाहणी केली. पावसाळयापूर्वी जिथे पाणी साठते ती सर्व कामे तातडीने पूर्ण करून घ्या. ड्रेनेज लाईन व इतर कामे तातडीने करा. उद्यानामधील मूळ वास्तूशिल्पास कोणताही धक्का न लावता येथील कामे पूर्ण करून घेण्याच्या सूचना त्यांनी शहर अभियंत्यांना दिल्या.
शहर अभियंता हर्षजीत घाटगे, विजय साळोखे, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, सतीश फप्पे, शाखा अभियंता अरुणकुमार गवळी, कनिष्ठ अभियंता व्ही. एन. सुरवसे, अनुराधा वांडरे, उमेश बागूल, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.