आजरा ः पोलीस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः पोलीस वृत्त
आजरा ः पोलीस वृत्त

आजरा ः पोलीस वृत्त

sakal_logo
By

आजऱ्यात घरफोडी, मोटारसायकलसह दागिने चोरीस

आजराः शहरात बंद घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी सहा हजार रुपये रोख, चांदीचे दागिने व मोटारसायकल असा चाळीस हजारांचा मुद्देमाल पळवला. सुनिल गणपती नाईक यांनी आजरा पोलिसांत फिर्याद दिली आहे. चार दिवसांपुर्वी श्री.नाईक हे कुटुंबीयांसह गावी गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी घर फोडले. चोरट्यांनी गॅलरीवर जावून दरवाजाचा कडी कोयंडा उचकटला व घरात प्रवेश केला. सोन्या- चांदीचे सोळा हजारांचे दागिने, आठ हजारांची रोकड व अठरा हजारांची मोटारसायकल लंपास केली. अंमलदार संतोष घस्ती अधिक तपास करीत आहेत.