
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात कोल्हापूरचे धवल यश
03269
राज्यस्तर विज्ञान प्रदर्शनात कोल्हापूरचे यश
कोल्हापूर ः ऑनलाईन स्वरूपात ५० वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन ४ ते ८ मे या दरम्यान झाले. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक, विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या प्रदर्शनातील प्राथमिक गटात करनूर (ता. कागल) येथील विद्यामंदिर रामकृष्णनगरमधील अवधूत संजय कांबळे या विद्यार्थ्याने ‘पर्यावरणपूरक कागद’ या विषयावरील प्रकल्प सादर करत प्रथम क्रमांक मिळविला. त्याला विद्या आयरे यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रकल्पामध्ये अवधूत याने पर्यावरणातील गवत, झाडांचा पालापाचोळा, कोरफड, भेंडीचा रस अशा काही सहज विघटनशील गोष्टींचा वापर करून पर्यावरणपूरक कागद बनवता येत असल्याची संकल्पना मांडली. शिक्षकांच्या प्राथमिक गटामध्ये बावेली (ता. गगनबावडा) येथील विद्यामंदिरचे सतीश कुंभार यांच्या प्रकल्पाने द्वितीय क्रमांक मिळविला.