आय.सी.एल. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आय.सी.एल.
आय.सी.एल.

आय.सी.एल.

sakal_logo
By

लोगो-
आय.सी.एल.
-----------
०३२७२
कोल्हापूर ः ‘सकाळ माध्यम समूह’ व एच. आर. फोरम इंडिया यांच्यातर्फे आयोजित पहिल्या ‘इंडस्ट्रियल क्रिकेट लीग २०२३’ स्पर्धेत मंगळवारी वारणा संघाच्या सचिन पाटील यांचा सदा साखर संघाच्या सर्जेराव ... यांनी त्रिफळा उडविला, तो क्षण.

विलो पंप्स, किर्लोस्कर ऑइल उपांत्यपूर्व फेरीत
---
‘सकाळ’ व एच. आर. फोरम प्रायोजित स्पर्धा; घाटगे-पाटील, वारणा ग्रुप पुढील फेरीत

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : ‘सकाळ माध्यम समूह’ व एच. आर. फोरम इंडिया यांच्यातर्फे आयोजित पहिल्या ‘इंडस्ट्रियल क्रिकेट लीग २०२३’ क्रिकेट स्पर्धेत आज बाद फेरीत विलो पंप्स व किर्लोस्कर ऑइल इंजिन्स संघाने प्रतिस्पर्धी संघांवर मात करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. साखळी फेरीतील सामन्यात घाटगे पाटील इंडस्ट्रीज व वारणा ग्रुप संघांनी गुणतालिकेत अनुक्रमे आघाडी घेऊन पुढील फेरीत प्रवेश केला. स्पर्धेतील दुसरी सुपर ओव्हर होऊन रोमहर्षक सामने झाले. दत्ताजीराव परशुराम माने सराफ स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असून, सिनर्जिक सेफ्टी शूज प्रायोजक, तर वेलेटा विथ मिनरल हायड्रेशन पार्टनर आहे. शास्त्रीनगर मैदानावर स्पर्धा सुरू आहे.  

*************
०३२५९
सरोज ग्रुपच्या विरुद्ध खेळताना सदा साखरच्या महादेव शेंडे यांना सामनावीरचा चषक देताना संतोष शिरसेकर.

सुपर ओव्हरमध्ये
‘सदा साखर’ भारी
प्रथम फलंदाजी करताना सरोज ग्रुप ऑफ कंपनीज संघाने तीन बाद ५१ धावा केल्या. त्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या सदा साखर कारखान्याने पाच बाद ५१ अशी धावसंख्या उभारत सामना बरोबरीत आणला. सरोज ग्रुपकडून अमर कदम यांनी २६ व विश्वजित साबळे यांनी १० धावा केला. ‘सदा साखर’कडून महादेव एस. यांनी २५, संदीप जकाते यांनी ११ धावा केल्या. सरोज ग्रुपच्या संतोष ए. यांनी दोन, यदना व विश्वजित साबळे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. निर्धारित षटकात बरोबरीत राहिलेला सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सदा साखर संघाने दोन गडी गमावत आठ धावा केल्या. संदीप जकाते यांनी सहा धावांचे योगदान दिले. सरोज ग्रुपच्या विश्वजित साबळे यांनी दोन गडी बाद केले. उत्तरादाखल खेळताना सरोज ग्रुपने अवघ्या दोन चेंडूंत दोन गडी गमावत दोनच धावा केल्या. ‘सदा साखर’च्या संदीप जकाते यांनी एक गडी बाद केला. महादेव एस. सामनावीर ठरले.

*******
०३२६०
वारणा ग्रुपच्या विरुद्ध खेळताना घाटगे-पाटील ग्रुपच्या असलेश कांबळे यांना सामनावीरचा चषक देताना दिनेश दिवाण.

घाटगे-पाटील इंडस्ट्रीजची
वारणा ग्रुप संघावत मात
प्रथम फलंदाजी करणाऱ्या घाटगे-पाटील इंडस्ट्रीजने एक गडी गमावत ८७ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणारा वारणा ग्रुप संघ तीन गडी गमावत ७३ धावाच करू शकला. ‘घाटगे-पाटील’च्या अश्लेष कांबळे यांनी ५८, अमित जगताप यांनी १२ धावांचे योगदान दिले. ‘वारणा’कडून इस्माईल यांनी एक बळी घेतला. धावसंख्येचा पाठलाग करताना वारणा संघाच्या संजय जमदाडे यांनी ४९ व अमोल लठ्ठे यांनी १९ धावांची खेळी केली. ‘घाटगे-पाटील’च्या विकास पालेकर व सौरभ माळी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. आश्‍लेष कांबळे सामनावीर ठरले.

********
०३२६८
वारणा ग्रुपच्या संजय जमदाडे यांना सामनावीरचा चषक देताना सर्जेराव चव्हाण.

वारणा ग्रुपचा झटपट विजय
प्रथम फलंदाजी करणाऱ्या सदा साखर संघाने दिलेल्या सहा गडी गमावत ४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या वारणा ग्रुप संघाने चार षटकांत दोन बाद ४९ धावसंख्या उभारत सोपा विजय मिळविला. यात ‘सदा साखर’च्या नंदू नरे यांनी २५, सुनील मुसळे यांनी १६ धावांचे योगदान दिले. ‘वारणा’कडून संजय जमदाडे यांनी दोन व सचिन पाटील यांनी एक गडी बाद केला. वारणा संघाच्या संजय जमदाडे यांनी २४ धावा केल्या. ‘सदा साखर’च्या राजेंद्र पाटील व सर्जेराव .... यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. संजय जमदाडे सामनावीर ठरले.

..........
०३२६१
सरोज ग्रुप विरुद्ध खेळताना घाटग-पाटील ग्रुपच्या अमित जगताप यांना सामनावीर चषक देताना शंतनू जाधव.

घाटगे-पाटील इंडस्ट्रीजचा दुसरा विजय
घाटगे पाटील इंडस्ट्रीजने सरोज ग्रुप ऑफ कंपनीवर मात करीत दिवसातील दुसरा विजय नोंदविला. त्यांनी निर्धारित सहा षटकांत सहा बाद ७९ धावा केल्या आणि सरोज ग्रुपला तीन बाद ६१ धावांवर रोखले. घाटगे-पाटील संघाकडून अमित जगताप यांनी ३४, अश्लेष कांबळे यांनी १८ धावा केल्या. सरोज ग्रुपच्या यदना यांनी दोन बळी घेतले. सरोज ग्रुपकडून यदना यांनी ३४ धावा केल्या. घाटगे-पाटील ग्रुपकडून विकास पालेकर, नितीन बी. व सौरभ माळी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. अमित जगताप सामनावीर ठरले.

........
०३२६४
वारणा ग्रुपच्या संजय जमदाडे यांना सामनावीरचा चषक देताना प्रभाकर कुलकर्णी.

संजय जमदाडे यांचे
धडाकेबाज अर्धशतक
सरोज ग्रुप ऑफ कंपनीजने सहा बाद ५६ धावांचे दिलेले आव्हान एक बाद ५८ असे पूर्ण करीत वारणा ग्रुप संघाने नऊ गडी राखून विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना सरोज ग्रुपकडून विश्वजित साबळे यांनी २३ व विश्वनाथ गायकवाड यांनी १६ धावांचे योगदान दिले. वारणा संघाच्या घनश्याम भडवले यांनी दोन, अमोल उगले व रवींद्र पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. धावांचा पाठलाग करताना वारणा ग्रुपच्या संजय जमदाडे यांनी ५३ धावा केल्या. यात चार चौकार, पाच षटकार लगावले. सरोज ग्रुपच्या यदना याने एक गडी बाद केला. संजय जमदाडे सामनावीर ठरले.

.......
०३२६२
‘सदा साखर’च्या विरुद्धच्या सामन्यात घाटगे-पाटील ग्रुपच्या अमित जगताप यांना सामनावीरचा चषक देताना पंकज व्हटकर.

‘घाटगे-पाटील’ची
विजयाची हॅटट्रिक

घाटगे-पाटील ग्रुप संघाने दिवसभरातील तिसरा विजय नोंदवत हॅटट्रिक केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या सदा साखर कारखान्याने सहा गडी गमावत ६० धावा केल्या. हे आव्हान घाटगे-पाटील ग्रुप संघाने तीन बाद ६२ असे पूर्ण केले. ‘सदा साखर’कडून संदीप जकाते यांनी २३, सूरज यांनी १२ धावांचे योगदान दिले. ‘घाटगे-पाटील’च्या विकास पालेकर, प्रवीण पाटील व सौरभ माळी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. ‘घाटगे-पाटील’च्या अमित जगताप यांनी ३३, नितीन बी. यांनी १० धावा केल्या. ‘सदा साखर’च्या राजेंद्र पाटील यांनी दोन व काकासो यांनी एक गडी बाद केला. अमित जगताप सामनावीर ठरले.

.......
०३२७०

‘सेराप्लक्स’च्या विरुद्ध खेळताना ‘विलो’च्या अजय कोरे यांना सामनावीरचा चषक देताना संजय बेनके.

विलो पंप
उपांत्यपूर्व फेरीत
बाद फेरीतील पहिल्या सामन्यात विलो पंप संघाने सेराफ्लक्स इंडिया प्रा. लि. संघावर सात गडी राखून विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या सेराफ्लक्स संघाने चार बाद ६८ धावा केल्या. यात संदीप पाटील व रोहन जाधव यांनी प्रत्येकी २१ धावांचे योगदान दिले. विलो पंपकडून सागर जाधव व प्रवीण शेंडगे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. धावांचा पाठलाग करणाऱ्या विलो पंप संघाने तीन बाद ७२ धावा करीत विजय मिळविला. यात अजय कोरे यांनी ३७, तर प्रवीण शेंडगे यांनी १३ धावा केल्या. ‘सेराफ्लक्स’कडून मनोज कोंडेकर यांनी दोन, अफसर शेख यांनी एक बळी घेतला. अजय कोरे सामनावीर ठरले.

......
०३२६६
‘किर्लोस्कर’च्या सचिन शिरोळे यांना सामनावीरचा चषक देताना अक्षय कांबळी.

शतकी धावसंख्या उभारत
‘किर्लोस्कर’चा थाटात विजय
बाद फेरीतील दुसऱ्या सामन्यात सहा षटकांत एक बाद १०० धावसंख्या उभारणाऱ्या किर्लोस्कर ऑइल इंजिन संघाने कोटक महिंद्रा बँक संघाला चार बाद ४२ धावांवर रोखले आणि ५८ धावांनी विजय मिळविला. या विजयाद्वारे त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना ‘किर्लोस्कर’कडून सचिन शिरोळे यांनी ५१ धावा केल्या. यात त्यांनी सात षटकार खेचले. सोबतीला पी. डी. २७ व अजय शिरोळे यांनी २० धावांची खेळी केली. धावांचा पाठलाग करताना कोटक बँकेकडून विनू वागरे यांनी १७, विशाल पोवार यांनी १५ धावा केल्या. ‘किर्लोस्कर’च्या रणजित पाटील यांनी दोन, शंकर चौगुले व अमर पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सचिन शिरोळे सामनावीर ठरले.

**************
आजचे सामने 
सकाळी ८- सिनर्जी ग्रीन विरुद्ध ट्रेंडी व्हील्स 
सकाळी ९ - दाना ग्रुप विरुद्ध किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड 
सकाळी १० - सिनर्जी ग्रीन विरुद्ध दाना ग्रुप 
सकाळी ११ - ट्रेंडी व्हिल्स विरुद्ध किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड 
सकाळी १२ - दाना ग्रुप विरुद्ध ट्रेंडी व्हील्स 
दुपारी १- सिनर्जी ग्रीन विरुद्ध किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड 

बाद फेरीतील सामना 
दुपारी २- दाना कोल्हापूर विरुद्ध व्ही. पी. कोल्हापूर