Wed, October 4, 2023

कचरा आग
कचरा आग
Published on : 16 May 2023, 5:43 am
आग आटोक्यात
आणण्यासाठी
प्रयत्न सुरूच
कोल्हापूर ः दोन दिवसांपासून प्रयत्न करूनही कसबा बावडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पावरील कचऱ्याला लागलेली आग अजूनही धुमसत आहे. चार फायर फायटर व तीन टॅंकर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
रविवारी कचऱ्याला मोठी आग लागली. तेव्हापासून अग्निशमन यंत्रणेची यंत्रणा काम करत आहे. सोमवारी बहुतांश आग आटोक्यात आली. पण, पूर्ण आटोक्यात आलेली नाही. मंगळवारीही दिवसभर फायर फायटर व टॅंकर प्रयत्न करत होते. उन्हाचा तडाखा वाढलेला असल्याने कचऱ्याच्या ढिगातून अजूनही आग धुमसत आहे. त्यातून धूर येत असून, आणखी काही दिवस प्रयत्न करावे लागण्याची चिन्हे आहेत.