सीपीआर वृत्त

सीपीआर वृत्त

राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे
अधिष्ठाता डॉ. दीक्षित यांची स्वेच्छानिवृत्ती

कोल्हापूर, ता. १६ ः राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांनी आज स्वेच्छानिवृत्ती घेतली. सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना अचानकपणे डॉ. दीक्षित यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने सीपीआर रुग्णालयासह वैद्यकीय शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीत सीपीआर रुग्णालयातील उपचार सेवा दिली जाते. तसेच वैद्यकीय शिक्षण दिले जाते.
दीड वर्षापूर्वी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून डॉ. दीक्षित यांची कोल्हापुरात अधिष्ठाता पदावर पदोन्नती झाली होती. त्यांनी येथे पदभार घेतल्यानंतर सीपीआरच्या पायाभूत सुविधा सक्षम करणे, तसेच वैद्यकीय महाविद्यालयात पीजीच्या जागांना मंजुरी मिळवणे, सामाजिक दातृत्वातून उपचारपूरक सुविधा देणे अशी कामे झाली. गेल्या तीन महिन्यांपासून सीपीआरमधील सफाई कामगारांचा ठेका, त्याची सहा कोटी रकमेची तफावत यावरून आंदोलन व तक्रारी सुरू झाल्या होत्या.
डॉ. दीक्षित यांनी कौटुंबिक कारणामुळे स्वेच्छानिवृत्ती मिळावी, अशा मागणीचा अर्ज शासनाकडे केला होता. त्यानुसार स्वेच्छा निवृत्तीची मंजुरी झाली आहे. त्यानुसार डॉ. दीक्षित कार्यमुक्त झाले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली. दरम्यान, अधिष्ठाता डॉ. दीक्षित यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल आउट ऑॅफ कव्हरेज लागत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com