फुटबॉल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुटबॉल
फुटबॉल

फुटबॉल

sakal_logo
By

श्रीमंत शाहू महाराज यांचा
गुरुवारी नागरी सत्कार
कोल्हापूर, ता.१६ : शाहू छत्रपती गोल्ड कप अखिल भारतीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी गुरुवारी (ता. १८) श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा मानपत्र देऊन नागरी सत्कार होणार आहे. ही माहिती केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘‘या सामन्यावेळी केरळचे प्रसिद्ध चेंडा वाद्यवृंद आणि भव्य आतषबाजी आकर्षण ठरणार आहे. सामन्याच्या बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एआयएफएफचे सरचिटणीस डॉ. शाजी प्रभाकरन तसेच भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार के. विजयन, युवराज संभाजीराजे, इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सचिव साउटर वाझ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. बक्षीस समारंभावेळी शाजी प्रभाकरन यांची आशियाई फुटबॉल संघटनेच्या विशेष सल्लागार समितीवर निवड झाल्याबद्दल गौरव करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विजेता- उपविजेता संघांना शाहू गोल्ड कपची चांदीची प्रतिकृती देण्यात येणार आहे. उत्कृष्ट कामगिरी केलेल्या चार स्थानिक संघांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. 
खेळाडूंना विनाशुल्क वैद्यकीय सेवा
दरम्यान, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या वाढदिवसानिमित्ताने एसएमपीएस हॉस्पिटलतर्फे कोल्हापुरातील सोळा फुटबॉल संघांच्या खेळाडूंना हेल्थ कार्डचे  वाटप करण्यात आले. या खेळाडूंना वर्षभर मोफत चेकअप किंवा दुखापत झाल्यास मोफत उपचार करून दिले जातील, असे हॉस्पिटलचे रौनक शहा यांनी यावेळी सांगितले.