सीपीआर वृत्त २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीपीआर वृत्त २
सीपीआर वृत्त २

सीपीआर वृत्त २

sakal_logo
By

डॉ. दीक्षित यांच्या कारभाराची
खातेनिहाय चौकशीची मागणी

कोल्हापूर, ता. १७ ः येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे निवृत्त अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांच्या कारभाराची खातेनिहाय चौकशी करावी, लाचलुपत प्रतिबंधक विभागाकडे गुन्हा नोंद करावा, तोपर्यंत डॉ. दीक्षित यांना सेवानिवृत्तीनंतरचे अर्थिक लाभ देऊ नयेत, अशा मागणीचे निवेदन कोल्हापूर शहर सर्वपक्षीय संघटीत कामगार अन्याय निवारण समितीने मुख्यमंत्री कक्ष व वैद्यकीय शिक्षण संचालकांकडे पाठविले आहे.
निवेदनात म्हटले आहे, डॉ. दीक्षित यांच्या सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना, अचानकपणे त्यांनी स्वेच्छासेवा निवृत्ती स्विकारली. गेल्या तीन महिन्यांपासून सीपीआर रूग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांच्या पगारातील ६.५ कोटीचा हिशेब २०१७ पासून जुळत नाही. अधिष्ठाता व ठेकेदारांनी या व्यवहाराचा हिशेब द्यावा, अशी समितीची मागणी केली. जिल्हाधिकारी, सहा. कामगार आयुक्त, संचालक वैद्यकीय शिक्षण संचालक यांच्याकडे यासंर्दभात तक्रारी दाखल झाल्या आहेत.लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ अन्वये त्या खात्याकडे तक्रार दाखल करावी, अशी मागणी समितीने केली. अशा परिस्थितीत अचानकपणे डॉ. दीक्षित यांनी स्वेच्छासेवा घेतली. शासनाच्या रक्कमेचा तसेच कंत्राटी सफाई कामगारांच्या पगारातील पैशाचा अपहार झाल्याचा समितीचा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करावी तोपर्यंत डॉ. दीक्षित यांना सेवानिवृत्तीनंतरचे अर्थिक लाभ देऊ नयेत.
समितीने मुख्यमंत्री कक्ष व मुंबई येथील वैद्यकिय शिक्षण खात्याचे संचालक यांना ईमेल व्दारे निवेदन पाठवले आहे. अशी माहिती समितीचे निमंत्रक बाबा इंदूलकर यांनी दिली आहे.
....
‘कौटुंबिक कारणामुळे मी १ फेब्रुवारी २०२३ ला स्वेच्छानिवृत्ती मिळावी, यासाठी शासनाकडे अर्ज केला होता. तो अर्ज १५ मे रोजी मंजूर झाला. त्यानुसार माझी स्वेच्छानिवृत्ती झाली. सफाई कंत्राट व त्यातील सहा कोटी तफावत या विषयी असंघटित कामगार अन्याय निवारण समितीने उपस्थितीत केलेला विषय माझ्याकडे ६ मार्च २०२३ ला आला. मी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जेमतेम एक वर्षीपूर्वीच रूजू झालो होतो. सफाईकामाचा ठेका, त्यातील रक्कमेचा विषय २०१७ पासूनचा आहे. त्याविषयी जिल्हाधिकारी यांच्याकडेही सविस्तर माहिती मी दिली आहे. त्यामुळे समितीने उपस्थितीत केलेल्या तक्रारीमुळे माझी स्वेच्छानिवृत्ती नसून माझ्या कौटुंबिक अडचणींमुळे ती घेतली आहे.

डॉ. प्रदीप दीक्षित, सेवानिवृत्त अधिष्ठाता,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय