टेंबलाई मर्डर आझाद मुलतानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेंबलाई मर्डर आझाद मुलतानी
टेंबलाई मर्डर आझाद मुलतानी

टेंबलाई मर्डर आझाद मुलतानी

sakal_logo
By

फोटो -
३२८२
कोल्हापूर ः टेंबलाई उड्डाणपुलाजवळील झोपडपट्टीत मंगळवारी रात्री खून झाला. घटनास्थळी पोलिस आल्यावर जमलेले स्थानिक.
(नितीन जाधव ः सकाळ छायाचित्रसेवा)
३२८१ - आझाद मुलतानी
३२८४ - निखिल गवळी
०००००००००००
वाढावा फोटो
३२८३
घटनास्थळी असलेला पोलिस बंदोबस्त.
०३२८५ -
घटनास्थळाची पाहणी करताना पोलिस अधिकारी.
---------------------------------------------

करणी संशयातून घरात घुसून खून
---
टेंबलाई उड्डाणपूल झोपडपट्टीतील प्रकार
---
जेवणात मग्न कुटुंबावर तलवारीने सपासप वार
---
प्रतिकारावेळी सूनही जखमी, संशयित स्वतःहून पोलिसांत हजर

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः करणी केल्याच्या संशयावरून आज रात्री नऊच्या दरम्यान घरी जेवायला बसलेल्या कुटुंबावर छोट्या तलवारीने सपासप वार करून सेंट्रिंग कामगाराचा खून झाला. आझाद मुकबुल मुलतानी (वय ४८) असे मृताचे आहे. त्यांच्यावर होणारे वार अडविण्यासाठी धावून गेलेली सून अफसाना असिफ मुलतानी (२२) गंभीर जखमी झाली. तिला ‘सीपीआर’मध्ये दाखल केले आहे. टेंबलाई उड्डाणपुलाशेजारील बीएसएनएल टॉवरसमोरील झोपडपट्टीत हा प्रकार घडला. त्यांच्या शेजारीच राहणारा संशयित निखिल रवींद्र ऊर्फ पिंटू गवळी (२२) स्वतःहून राजारामपुरी पोलिस ठाण्यात हजर झाला. करणी करीत असल्याच्या संशयावरून आझाद मुलतानीचा खून केल्याची कबुली त्याने दिल्याचे राजारामपुरी पोलिसांनी सांगितले. तो टेम्पोचालक असून, त्याच्याविरोधात यापूर्वी कोणतेही पोलिस रेकॉर्ड नसल्याचेही सांगण्यात आले.
या प्रकाराबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः टेंबलाई उड्डाणपुलाशेजारील बीएसएनएल टॉवरसमोर दाट वस्तीची झोपडपट्टी आहे. याच बोळात निखिल गवळी आणि मुलतानी कुटुंबे राहतात. रात्री साडेआठच्या सुमारास निखिल घरी आला, तेव्हा त्या बोळातील सर्व घरांचे दरवाजे बंद होते. तो घरी जाऊन बसला. शेजारी मुलतानी यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. त्यांचे दोन खोल्यांचे घर आहे. बाहेरच्या खोलीत आझाद, त्यांच्या पत्नी रेहाना, सून आयेशा, अफसाना आणि लहान मुलगा असे एकत्रित जेवायला बसले होते. या वेळी अचानक निखिल छोटी तलवार घेऊन त्यांच्या घरात घुसला. आझाद यांच्यावर पाठमोरे वार केले. पहिलाच वार त्यांच्या मानेवर बसला. आझाद यांच्यासमोर जेवायला बसलेली सून अफसाना यांनी निखिलच्या अंगावर धाव घेवून वार अडविण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यात तीही जखमी झाली. याच वेळात निखिलने आझाद मुलतानी यांच्यावर सात-आठ वार केले. हल्ल्यावेळी आरडाओरड झाला. त्या आवाजाने आजूबाजूचे तेथे धावून आले. त्या वेळी निखिल तलवार घेऊन तेथून निघून गेला. थोड्याच वेळात आझाद यांचे नातेवाईक-भाचे तेथे आले. त्यांनी त्यांना रिक्षातून ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. मात्र, आझाद यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी ‘सीपीआर’ पोलिसांना सांगितले.
दरम्यान, सीपीआर पोलिस चौकीतील कॉन्स्टेबल हेगडे-पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्यांना माहिती दिली. याचवेळी आझाद यांचा कामावर गेलेला मुलगा तौसिफ ‘सीपीआर’मध्ये आला होता. त्याने शेजारी निखिलनेच खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह शाहूपुरी पोलिस ठाण्यातील अधिकारी तेथे हजर झाले. शाहूवाडीतून घरी जात असलेले शहर पोलिस उपअधीक्षक ही माहिती कळताच घटनास्थळी आले. याच दरम्यान खून केलेला निखिल थेट पोलिस ठाण्यात हजर झाला होता. शेजारील आझाद मुलतानी करणी करीत असल्याने त्यांचा खून केल्याची कबुली त्याने दिली. खून झाला असला, तरीही संशयित हजर झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्‍त आहे. त्याने परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, उपअधीक्षक मंगेश चव्हाण घटनास्थळी थांबून होते. बोळात घराला घर लागून असल्याने नेमक्या कोणत्या घरात हल्ला झाला, हे सहज समजून येत नव्हते.

निखिलने खून केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना कळताच घरातील सर्वांनीच तेथून पळ काढला. पोलिसांनी त्याच्या घराची माहिती घेतली. निखिलने छोटी तलवार कोठून आणली, याचाही शोध सुरू केला. त्या घराचीही झडती घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलतानी आणि गवळी कुटुंब दहा-पंधरा वर्षे याच बोळात राहतात. यापूर्वी कधीही त्यांच्यात वाद झालेला नाही. खडकलाट येथून पंधरा वर्षांपूर्वी मुलतानी कुटुंब येथे आल्याचेही परिसरातून सांगण्यात आले.

चौकटी
निखिल येताच दरवाजे बंद
निखिलचे वागणे योग्य नसल्याने सायंकाळी तो घरी येत असताना गल्लीतील सर्वजण दरवाजे बंद करून घेत होते. मात्र, त्याच्यावर आजपर्यंत एकही गुन्हा दाखल नाही. त्याच्याविरोधात परिसरातीलच नव्हे, तर इतर कोणतीही तक्रारही नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सात ते आठ वार
‘सीपीआर’मध्ये आझाद यांचा मुलगा तौसिफ याने घटनेची माहिती दिली. त्याला अश्रू अनावर झाले होते व बोलणेही शक्य झाले नाही. आझाद यांच्या अंगावर सुमारे सात-आठ वार झाल्याची माहिती सीपीआर पोलिस चौकीतून देण्यात आली.


खोली बंद करून पंचनामा
खून झालेल्या खोलीत रक्ताचा सडा पसरला होता. जेवणाची ताटे अस्ताव्यस्त पडली होती. छोट्या खोलीमुळे पंचनामा करणेही पोलिसांसाठी मुश्‍कील काम झाले होते. परिसरात बघ्यांची गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी दरवाजा बंद करून पंचनामा केला. आजूबाजूच्या सर्व महिला बोळातील रस्त्यावर बसून होत्या. तेथे तणावपूर्ण शांतता होती. पोलिसांशिवाय इतर कोणालाही तेथे थांबू दिले जात नव्हते. आझाद यांचे नातेवाईक पोलिसांना माहिती देत होते.

अन्य कारणांचाही तपास होणार
टेंबलाई चौकातील या झोपडपट्टीत बहुतांश कष्टकरी आहेत. बहुतांश रोजंदारीवर काम करून संसाराचा गाडा ढकलतात. मिळेल ते काम करतात. अशाच घरात हा प्रकार घडला. दरम्यान, हल्ल्यामागील अन्य कारणांचा तपास होणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

दुहेरी खुनाची चर्चा
यापूर्वी याच टेंबलाई टॉवर चौकात दुहेरी खून झाला होता. त्या वेळी गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात होती. आजही रात्री तेथे खून झाल्याची माहिती मिळताच अनेकांना दुहेरी खून झाला आहे काय, अशी विचारणा पोलिसांसह परिसरात होत होती.
-----------------