जागतिक वस्तू संग्रहालय दिन

जागतिक वस्तू संग्रहालय दिन

लोगो- जागतिक संग्रहालय दिन
........

फोटो-40952
...

अमूल्य ठेव्याची पर्यटकांना भुरळ
कोल्हापूरच्या प्राचीन इतिहासाचे साक्षीदार, संशोधनासाठीही मदत

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः प्राचीन आणि ऐतिहासिक पाऊलखुणा जपलेल्या येथील वस्तू संग्रहालयांत पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. युवा संशोधकांना संशोधनासाठीही ही संग्रहालये उपयोगी ठरत असून आणखी महिनाभर पर्यटकांची गर्दी वाढतच जाणार आहे.
बावीसशे वर्षापूर्वीचं कोल्हापूर अनुभवण्यासाठी टाऊन हॉल येथील कोल्हापूर वस्तू संग्रहालय पाहायलाच हवे, या भूमिकेतून विविध उपक्रम झाले आणि या संग्रहालयाकडे पर्यटकांची पावलं वळली. शालेय विद्यार्थ्यांच्या क्षेत्र भेटींच्या माध्यमातूनही हा अमूल्य ठेवा सर्वांपर्यंत पोचू लागला आहे. बावीसशे वर्षांपूर्वी कोल्हापुरात मातीची भांडी कशी होती, आरशांना पंचधातूच्या फ्रेमची सजावट कशी होती, अशा कोल्हापूरच्या प्राचीन वैभवापासून ते ब्रम्हपुरी उत्खननात सापडलेले विविध प्राचीन अवशेष येथे तितक्‍याच आत्मीयतेने जपून ठेवले आहेत. संग्रहालयातील पंचधातूच्या सुमारे ३५ वस्तू अशा आहेत, की कोल्हापूर त्या काळातही किती विकसित होते, याचे ते पुरावे आहेत.
न्यू पॅलेसमधील शहाजी छत्रपती संग्रहालयात करवीर संस्थानचा ऐतिहासिक वारसा जपला आहे. इतिहासाशी निगडित अनेक दुर्मिळ वस्तू, शास्त्रीय संगीताच्या दुर्मिळ रेकॉर्डस, विशेष प्रसंगी घेतलेल्या फिल्म्स, शिकार केलेल्या प्राण्यांच्या अवशेषांपासून बनविलेल्या वस्तू, जुनी ऐतिहासिक कागदपत्रे, पत्र व्यवहार आदी अमूल्य ठेवा या संग्रहालयात जपला आहे. या संग्रहालयाला सरासरी एक ते दीड हजार पर्यटक रोज भेट देतात. राजारामपुरीतील चंद्रकांत मांडरे संग्रहालयामध्येही मराठी सिनेसृष्टीतील सुवर्णकाळ अनुभवायला मिळतो.
...........

आज विनामूल्य प्रवेश

जागतिक संग्रहालय दिनानिमित्त उद्या (ता. १८) शासनाच्या अखत्यारितील टाऊन हॉल व चंद्रकांत मांडरे संग्रहाल येथे सर्वांना विनामूल्य पाहाण्यासाठी खुली ठेवली जाणार आहेत. इतरवेळी एक ते पंधरा वयापर्यंतच्या मुलांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याकडे आयकार्ड असेल तर पाच रुपये, प्रौढांना दहा रुपये व परदेशी पर्यटकांसाठी शंभर रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. टाऊन हॉलला रोज सव्वाशे ते दीडशे पर्यटक भेट देतात.
............
कोट

‘टाऊन हॉल वस्तू संग्रहालयाकडे केवळ देशातीलच नव्हे तर परदेशी पर्यटकही आता वळू लागले आहे. संशोधनासाठी काही माहिती हवी असेल तर तीही आम्ही संशोधक विद्यार्थ्यांना आवर्जून देतो. चंद्रकांत मांडरे संग्रहालयाला तुलनेत प्रतिसाद कमी असला तरी तो वाढावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

- उदय सुर्वे, सहाय्यक अभिरक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com