घाळी महाविद्यालयात भित्तीपत्रिकेचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाळी महाविद्यालयात भित्तीपत्रिकेचे प्रकाशन
घाळी महाविद्यालयात भित्तीपत्रिकेचे प्रकाशन

घाळी महाविद्यालयात भित्तीपत्रिकेचे प्रकाशन

sakal_logo
By

03303
गडहिंग्लज : घाळी महाविद्यालयात भित्तीपत्रिकेचे प्रकाशन झाले. याप्रसंगी डॉ. सतीश घाळी, किशोर हंजी, डॉ. मंगलकुमार पाटील, डॉ. दत्ता पाटील उपस्थित होते.

घाळी महाविद्यालयात भित्तीपत्रिकेचे प्रकाशन
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त भित्तीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. मराठी साहित्यातील गोंदण : शांता शेळके या विषयावर हे भित्तीपत्रिका आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. धनश्री कळसगोंडा व सरोजिनी घुळाण्णावर यांनी त्याचे लेखन केले आहे. शांता शेळके यांचे मराठी साहित्यात मोठे योगदान असल्याचे डॉ. घाळी यांनी सांगितले. संचालक किशोर हंजी, प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील, प्रा. भरत सोलापुरे, पोलिस उपनिरीक्षक सुषमा खोत, प्रा. अनिल उंदरे, डॉ. नीलेश शेळके, प्रा. वंदना खोराटे आदी उपस्थित होते. डॉ. दत्ता पाटील यांनी स्वागत केले. शुभांगी घाडेकर यांनी शांता शेळके यांच्या वाड:मयीन कार्याचा परिचय करुन दिला. घुळाण्णावर यांनी आभार मानले.