
भोगोली येथील रवळनाथ मंदिराचा सोमवार पासून वास्तुशांती सोहळा
03370
भोगोली ः ग्रामदैवत रवळनाथाचे नूतन मंदिर.
भोगोली येथील रवळनाथ मंदिराचा
सोमवारपासून वास्तुशांती सोहळा
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १७ : भोगोली (ता. चंदगड) येथील श्री देव रवळनाथ मंदिराची वास्तुशांती व कळसारोहण सोहळा सोमवार (ता. २२) ते बुधवार (ता. २४) अखेर होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या (ता.१८) पुंडलिक गावडे यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवण्यात येईल. सोमवारी (ता. २२) गावातून कळस मिरवणूक होईल. या दिवशी नंदकुमार गावडे यांचे प्रवचन व विश्वनाथ पाटील यांचे कीर्तन होईल. रात्री भजनाने जागर केला जाईल. मंगळवारी (ता. २३) शांती होम होईल. या दिवशी विश्वनाथ पाटील यांचे प्रवचन, तर राजेंद्र मोरे यांचे कीर्तन होईल. बुधवारी (ता. २३) बेळगाव येथील मुक्ती मठाचे सोमसिध्देश्वर महास्वामी यांच्या हस्ते कळसारोहन होईल. या दिवशी दुपारी एक वाजल्यापासून महाप्रसाद वाटप सुरु होईल. याचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.