यजमान जयहिंद संघ विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यजमान जयहिंद संघ विजेता
यजमान जयहिंद संघ विजेता

यजमान जयहिंद संघ विजेता

sakal_logo
By

ich173.jpg
03375
इचलकरंजी ः कबड्डी स्पर्धेतील विजेत्या यजमान जयहिंद संघाला आमदार पी.एन. पाटील यांच्याहस्ते बक्षिस दिले.
----------
यजमान जयहिंद संघ विजेता
इचलकरंजी कबड्डी स्पर्धा; सडोलीचा मावळा संघ उपविजेता

इचलकरंजी, ता. १७ ः येथील जयहिंद क्रीडा मंडळाच्या क्रीडांगणावर झालेल्या कबड्डी स्पर्धेतील यजमान जयहिंद संघाने विजेतेपद पटकावले. सडोलीच्या मावळा संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. देशभक्त बाबासाहेब खंजीरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्पर्धेचे आयोजन केले होते.
तीन दिवस चाललेल्या स्पर्धेची सांगता मंगळवारी रात्री उशिरा झाली. आमदार पी. एन. पाटील यांच्याहस्ते बक्षिस वितरण झाले. अंतिम सामना यजमान जयहिंद (इचलकरंजी) व मावळा (सडोली) यांच्यात झाला. या सामन्यात यजमान जयहिंद संघाने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत पहिल्या डावात १३ विरुद्ध ७ अशी सहा गुणांची आघाडी घेतली. मध्यंतरानंतर मावळा संघाच्या प्रसाद कुंभार याने चढाईच्या माध्यमातून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण जयहिंद मंडळाचा अष्टपैलू खेळाडू सौरभ फगरे-तोमर, प्रेम काळे यांच्या धारदार चढाया व मधल्या फळीतील बचावपट्टू सुहास मोहिते याचा भक्कम बचाव याच्या जोरावर जयहिंद संघाने सामना २७ विरुद्ध १७ अशा १० गुणांच्या फरकाने जिंकला. विजेत्यांना आमदार पाटील यांच्याहस्ते बक्षिस वितरण झाले. जन्मशताब्दी समिती कार्याध्यक्ष राहुल खंजीरे, उदय लोखंडे, उल्हास सूर्यवंशी, भगवान पवार, अरुण खंजीरे, सतिश डाळ्या आदी उपस्थीत होते.
तत्पूर्वी, जयहिंद (इचलकरंजी), मावळा (सडोली), शिवमुद्रा (कौलव) आणि जय हनुमान (बाचणी) या संघांनी उपांत्य फेरीतील प्रतिस्पर्धी संघावर मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात 14 गुणांच्या फरकाने मावळा संघाने विजय प्राप्त करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. जय हनुमान बाचणी संघ पराभूत झाला. दुसरा उपांत्य सामना जयहिंद व शिवमुद्रा यांच्यात झाला. दोन्ही संघानी चिवट झुंज दिली. अखेर जयहिंद संघाने तीन गुणांच्या फरकांना शिवमुद्रा संघाचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. शिवमुद्रा संघाला तृतीय व जय हनुमान संघाला चतुर्थ क्रमांकाचे बक्षिस दिले.
--------
वैयक्तिक बक्षीसे
सर्वोत्कृष्ट खेळाडू सौरभ फगरे - तोमर (जयहिंद)
उत्कृष्ट चढाईपटू - प्रसाद कुंभार (मावळा - सडोली),
उत्कृष्ट पक्कड - वैभव राबाडे (शिवमुद्रा - कौलव)
तिसऱ्या दिवशीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू - सौरभ जाधव (जय हनुमान - बाचणी)
---------
शहरातील क्रीडा संघांचा गौरव
इचलकरंजीतील क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल जन्मशताब्दी समितीतर्फे जयहिंद मंडळ, स्वराज्य मंडळ, रिंगण स्पोर्टस, शिवछत्रपती खो खो संघ, सीआरएसएसयु संघ, इलेव्हन स्पोर्ट्स, राजमाता जिजाऊ संघ, महाराष्ट्र स्पोर्ट्स, बालभारत क्रीडा मंडळ, डायनॅमिक स्पोर्टस, सरस्वती स्पोर्ट्स, आयएम फीट, इचलकरंजी क्रिकेट असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा खो-खो असोशिएशन आदी संघातील खेळाडू व प्रशिक्षक यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवले.