Thur, October 5, 2023

पर्यावरण दिन साजरा
पर्यावरण दिन साजरा
Published on : 17 May 2023, 4:08 am
03389
केएमसी कॉलेजतर्फे विविध उपक्रम
कोल्हापूर : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण केएमसी कॉलेज एनसीसी विभागातर्फे पर्यावरण वाचवाबाबत शपथ घेण्यात आली.
यामध्ये के एम सी कॉलेज, जी के जी कॉलेज, शाहू दयानंद हायस्कूल, इंदिरा गांधी विद्यानिकेतन, जय हनुमान हायस्कूल युनिटचे एनसीसी कॅडेट सहभागी झाले. कळंबा तलाव परिसराची स्वच्छता करण्यात आली. प्लास्टिकमुक्त कळंबा तलाव हे अभियान राबवण्यास सुरुवात केली. कळंबा गावात प्रभात फेरी काढली. उपायुक्त शिल्पा दरेकर, प्र. प्राचार्य अरुण पौडमल, ५६ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विजयंत थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. लेफ्टनंट डॉ. अमित रेडेकर, अजित कारंडे, संग्राम सोनार, राजाराम चौगुले, सूरज चोपडे यांनी नियोजन केले.