भरारी पथकाचा दबदबा कायम

भरारी पथकाचा दबदबा कायम

लोगो ः इचलकरंजी महापालिकेतून

भरारी पथकाचा दबदबा कायम
३५ कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव

इचलकरंजी, ता. १७ ः येथील महापालिकेत प्रशासकिय शिस्त लावण्यासाठी स्थापन केलेल्या भरारी पथकाचा दरारा कायम राहिला आहे. आयुक्तांच्या गैरहजेरीतही या पथकाने दमदार कामगिरी नोंदवली आहे. तीन दिवसांत केलेल्या पाहणीत ३५ कर्मचाऱ्यांनी शिस्तभंग केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव आस्थापना विभागाकडे पाठवला आहे.
महापालिका झाल्यानंतर प्रशासकीय शिस्त राखण्यासाठी लिपीक सुनिल बेलेकर यांच्या नेतृत्वाखाली तिघा जणांचे भरारी पथक स्थापन केले आहे. पथकाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना प्रशासकीय शिस्त लावण्याचे काम करण्यात येत आहे. यामध्ये कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणे, ओळखपत्र न घालणे, गणवेश न घालणे अशा कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. सध्या आयुक्त सुधाकर देशमुख दीर्घ काळ रजेवर आहेत. त्यामुळे प्रशासकीय शिस्त बिघडू नये, यासाठी भरारी पथकावर कारवाईची जबाबदारी टाकली आहे. त्यानुसार ८ ते १० मेदरम्यान पथकाने पाहणी केली. यामध्ये पहिले दोन दिवस केलेल्या पाहणीत अनुक्रमे ३ व २ कर्मचारी उशिरा आले. तिसऱ्या दिवशी दुपारी केलेल्या पाहणीत कार्यालयात तब्बल ३० कर्मचारी उपस्थीत नसल्याचे दिसून आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव भरारी पथकाने आस्थापना विभागाकडे पाठवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com