संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त पट्टा
संक्षिप्त पट्टा

संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

`मंत्री सावंत यांची बदनामी थांबवावी’

कोल्हापूर ः राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची बदनामी थांबबावी, या मागणीसाठी बुधवारी (ता.१७) छत्रपती ग्रुपतर्फे मोर्चा काढण्यात आला. सकल मराठा समाजाचे समन्वयक दिलीप पाटील मंत्री सावंत यांची बदनामी करत असल्याची टीका यावेळी छत्रपती ग्रुपचे प्रमोद पाटील यांनी केली. दरम्यान, तानाजी सावंत यांनी केलेल्या पन्नास टक्क्यावरील आरक्षणाला आमचा विरोध असून त्यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करू नये, असे पत्रक दिलीप पाटील यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
..........
3415
प्रदेश संघटन सचिवपदी दिलीप जठार
कोल्हापूर ः अनुसुचित जाती-दमाती अखिल भारतीय परिसंघाच्या प्रदेश संघटन सचिवपदी येथील दिलीप जठार यांची निवड झाली. श्री. जठार १९७६ पासून कॉंग्रेसमध्ये कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रमांत अग्रेसर असतात. त्याची दखल घेवून ही निवड झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष उदित राज, प्रदेशाध्यक्ष सुखदेव गडपायले यांनी याबाबतचे पत्र त्यांना दिले आहे.
..........
सदृढ केसांवर शनिवारी व्याख्यान

कोल्हापूर : औरंगाबाद येथील प्रसिध्द आयुर्वेदाचार्या डॉ. रोहिणी काचोळे यांचे ‘तुम्ही व तुमचे केस’ या विषयावर मोफत व्याख्यान होणार आहे. स्वास्थ्यार्थम् आयुर्वेद आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनतर्फे याचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. २०) राजर्षी शाहू स्मारक भवनातील मिनी हॉलमध्ये सायंकाळी साडेपाचला हे व्याख्यान होईल. केस गळणे, अकाली पांढरे होणे, कोंडा होणे, चाई लागणे, अकाली टक्कल पडणे आदींवर डॉ. काचोळे मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुकांनी व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. प्रणव पाटील, डॉ. यशपाल हुलस्वार यांनी केले आहे.
..................
‘देवस्थान''चा खंड भरण्याचे आवाहन
कोल्हापूर ः देवस्थान समितीने राधानगरी तालुक्यातील काही गावातील जमिनी लिलावाव्दारे शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत किसान सभेच्या शिष्टमंडळाने सचिव सुशांत बनसोडे यांची भेट घेवून चर्चा केली. संबंधित शेतकऱ्यांकडून ठराविक मुदतीत खंड भरून घेवून लिलाव प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी यावेळी झाली. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांनी खंड भरावा. काही अडचणी आल्यास किसान सभेशी संपर्क साधावा, असे आवाहन अमोल नाईक यांनी केले आहे.