खरीपाच्या क्षेत्रात एक हजार हेक्टरने घट

खरीपाच्या क्षेत्रात एक हजार हेक्टरने घट

खरीपाच्या क्षेत्रात हजार हेक्टरने घट
उसाचे क्षेत्र वाढले; २१ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड, कृषी विभागाकडून तयारी
रणजित कालेकर : सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १७ : आजरा तालुक्यातील यंदा खरीपाच्या क्षेत्रात सुमारे एक हजार हेक्टने घट झाली आहे. यामध्ये खरीप भुईमुग, नागली व सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात घट होणार आहे. ऊस पिकाचे क्षेत्र तालुक्यात सुमारे चार हजार ७०० हेक्टरपर्यंत होते. यंदा ते पाच हजार ७०० हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. उचंगी, आंबेओहळ या प्रकल्पात पाणीसाठा झाल्याने ऊस पिकाकडे शेतकरी वळला आहे. त्यामुळे खरीप भूईमुग, नागली व सोयाबीन या पिकांना फटका बसला आहे. यंदा २१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची लागवड होणार असून कृषी विभागाकडून यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी तयारी सुरु आहे.
म्हाई, यात्रांचा हंगाम संपला आहे. लग्नसराई सुरू आहे. यामधून वेळ काढत शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे सुरू केली आहेत. पेरणीचा हंगाम वेळेत साधण्यासाठी वावर तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. शेतकरी कुटुंबांनी शेतात तळ ठोकला असून शेतीची कामे वेगाने सुरू आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही रोहिणीचा पेरा साधण्यासाठी शेतकरी प्रयत्नवत आहे. यंदा वळीव पावसाचे प्रमाण कमी राहिले. एप्रिल अखेरीस वळीवाचा पाऊस झाला. शेतकऱ्याला मृगाच्या पावसाची आस लागून राहिली आहे. पश्चिम भागात भात व नागलीसाठी तरवे तयार करण्याची कामे सुरू आहे. उत्तूर व पुर्व भागात पेरणीसाठी जमीन तयार करण्यात येत आहे. गत दोन वर्षात तालुक्यात उचंगी व आंबेओहळ प्रकल्प मार्गी लागले. या प्रकल्पात पाणीसाठा केला आहे. शेतकरी ऊस पिकाकडे वळला आहे. परिणामी खरीप भूईमूग, नागली व सोयाबीन या पिकांचे क्षेत्र घट होणार आहे. यंदा सुमारे एक हजार हेक्टरने ऊस पिकाचे क्षेत्र वाढले आहे. कृषी विभागाकडून खरीपाची तयारी करण्यात येत आहे. यंदा भाताच्या देशी वाणांच्या बरोबर संकरीत, सुधारीत व संशोधीत जातीच्या बियाण्यांची लागवड केली जाणार आहे.
-----------------
ग्राफ
पिक निहाय खरीपाची लागवड (हेक्टरमध्ये)
भात ९५००
नागली ३३००
एकूण तृणधान्य १२८०५
एकूण कडधान्यची लागवड ५
भुईमुग १८००
सोयाबीन ५००
ऊस ५७००
------------
चौकट
आजरा घनसाळची १०० हेक्टरवर लागवड
आजरा घनसाळ या पिकाची यंदा १०० हेक्टरवर लागवड होणार आहे. गतवर्षी काही गावात शेतकऱ्यांनी घनसाळ पिक काढून देखील चांगला दर मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी उदासीन आहे. त्यामुळे घनसाळ पिकाच्या क्षेत्रात म्हणावी तशी वाढ होणार नाही, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com