पर्यावरणपूरक जीवनशैली अवलंबावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरणपूरक जीवनशैली अवलंबावी
पर्यावरणपूरक जीवनशैली अवलंबावी

पर्यावरणपूरक जीवनशैली अवलंबावी

sakal_logo
By

पर्यावरणपूरक जीवनशैली अवलंबावी
दयानंद देसाई; शिवराजमध्ये एकदिवशीय कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १७ : लोकांनी आता पर्यावरणपूरक जीवनशैली अवलंबण्याची गरज असल्याचे मत ग्रीन फ्रेंडस अ‍ॅग्रोचे दयानंद देसाई यांनी व्यक्त केले.
येथील शिवराज महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागातर्फे उर्जा स्त्रोतांचे संवर्धन व पर्यावरणपूरक जीवनशैली या विषयावरील एक दिवशीय कार्यशाळेत ते बोलत होते. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम अध्यक्षस्थानी होते. संस्था सचिव डॉ. अनिल कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रीन फ्रेंडस अग्रोचे देसाई यांनी पर्यावरणपूरक जीवनशैली या विषयावर मार्गदर्शन करताना रोजच्या टाकाऊ पदार्थापासून उत्पन्न कशा पद्धतीने मिळवून शकतो, त्यामधून पर्यावरणाचे संवर्धन व उत्पन्नाचे साधन यातून होणारा दुहेरी फायदा, माती, हवा, पाणी यांचे संवर्धन करण्याची पद्धत याविषयी मार्गदर्शन केले.
पहिल्या सत्रात साधना व्होकशनलचे प्रा. विश्‍वनाथ गोरुले यांनी पारंपारिक उर्जा स्त्रोतांचा वापर किती प्रमाणात करावा, मानवी जीवनावर त्याचा कोणता प्रभाव पडतो, वैश्विक तापमानवाढीची कारणे, त्यासाठी आवश्यक पर्याय व पर्यावरणपूरक अपारंपरिक उर्जा स्त्रोत किती प्रमाणात उर्जा देतात याविषयी सविस्तर माहिती देवून मार्गदर्शन केले. लहान व मोठे अपारंपरिक उर्जा स्त्रोत प्रकल्प उभारण्याविषयीही त्यांनी माहिती दिली. सचिव डॉ. अनिल कुराडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. रेवती राजाराम, प्रा. प्रविण सरनोबत, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रा. प्रवीण गंदूगडे यांनी स्वागत केले. प्रा. गौरव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विजय सावंत यांनी आभार मानले.