
बातमी
03446
कोल्हापूर ः येथील शहाजी लॉ कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलताना विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील. शेजारी अन्य मान्यवर.
ध्येय निश्चित करून प्रयत्नांत
सातत्य ठेवा : डॉ. पी. एस. पाटील
कोल्हापूर, ता. १७ ःध्येय निश्चित करून प्रयत्नांत सातत्य ठेवल्यास हमखास यश मिळेल, असा कानमंत्र शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी दिला.
येथील शहाजी लॉ कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कौन्सिल ऑफ एज्युकेशन सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम होते.
डॉ. मगदूम म्हणाले, ‘महाविद्यालयीन जीवनात विविध स्पर्धांत घेतलेला सहभाग व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे.’ प्र. कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी केले. प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय व पाहुण्यांचे सत्कार जिमखाना सेक्रेटरी
प्रा. डॉ. एम. सी. शेख यांनी केले. विद्यार्थी परिषदचे अध्यक्ष सुयोग हातकर यांनी आभार मानले. डॉ. सविता रासम, प्रा. सुहास पत्की, डॉ. अस्मिता पाटील, डॉ. सुचिता सुरगीहळ्ळी यांनी नियोजन केले.