प्रारुप मतदार यादी हरकतीवरील सुनावणी पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रारुप मतदार यादी हरकतीवरील सुनावणी पूर्ण
प्रारुप मतदार यादी हरकतीवरील सुनावणी पूर्ण

प्रारुप मतदार यादी हरकतीवरील सुनावणी पूर्ण

sakal_logo
By

प्रारुप मतदार यादी हरकतीवरील सुनावणी पूर्ण
आजरा साखर कारखाना; १०८१ तक्रारी, दोन दिवसांत निकाल शक्य
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १७ ः आजरा साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या पार्श्वभूमीवर प्रारुप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध झाली होती. मतदार यादीवर १०८१ हरकती प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर याच्यांकडे दाखल झाल्या होत्या. त्याची सुनावणी मंगळवार (ता. १६) व बुधवार (ता. १७) या दोन दिवसांत पूर्ण झाली. याबाबत दोन दिवसांत निकाल लागण्याची शक्यता आहे.
आजरा साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रारुप मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. मतदार यादीवर १०८० व्यक्तींनी सभासद रद्द केल्याबद्दल हरकत घेतली होती. त्याचबरोबर मिनाक्षी शिवाजी रायकर (कोरीवडे) यांची नावाची बदलाबाबत हरकत होती. त्याबाबतही सुनावणी झाली आहे. प्रादेशिक सहसंचालक साखर, कोल्हापूर यांच्याकडे याबाबत त्यापैकी कारखान्याच्या रेकॉर्डनुसार ६३ व्यक्ती या मतदार यादीत समाविष्ट आहेत. उर्वरीत १०१७ या प्रादेशिक सहसंचालक साखर, कोल्हापूर यांच्या ११ मार्च २०२० च्या आदेशान्वे रद्द केले आहेत. याबाबतचे म्हणणे कारखाना प्रशासनाने दिले आहे. दोन दिवसांत याबाबत निकाल लागण्याची शक्यता आहे. २० जूनपूर्वी कारखान्याची निवडणूक होणे अपेक्षित आहे. त्यामुळे पक्की मतदार यादी लवकर प्रसिद्ध होणे आवश्यक आहे.
------------
यादीस विलंब झाल्यास निवडणूक लांबणीवर
पक्की मतदार यादी प्रसिध्द होण्यास विलंब झाल्यास कारखाना निवडणूक लांबण्याची शक्यता आहे. कारण लवकरच पावसाळा सुरु होणार असून पावसाळ्यामुळे ही निवडणुक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी लवकरच प्रसिद्ध झाल्यास निवडणूक अन्यथा निवडणुकीची आशा दुसर मानली जात आहे.