रत्नागिरी नागपूर महामार्गावर वड्डी बायपास नजीक अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी नागपूर महामार्गावर वड्डी बायपास नजीक अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू
रत्नागिरी नागपूर महामार्गावर वड्डी बायपास नजीक अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू

रत्नागिरी नागपूर महामार्गावर वड्डी बायपास नजीक अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू

sakal_logo
By

03474
जयवंत पोवार, स्नेहल पोवार, सोहम पोवार, उमेश शर्मा, लक्ष्मण शिंदे.

३५०३
कोमल शिंदे

05137
मिरज : येथील रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बोलेरो आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाल्यानंतर वाहनांची झालेली अवस्था.

05135
घटनास्थळी पाहणी करताना पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपाधीक्षक अजित टिके, मिरज ग्रामीणचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, सुधीर भालेराव.
....

विठुरायाच्या दर्शनाची आस अपुरीच...
मिरजेजवळ अपघातात सरवडेच्या एकाच कुटुंबातील तिघांसह सहा सहा ठार
पती, पत्नी, मुलगा सासूचा समावेश, दोन्ही मुली गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
मिरज, ता. १७ : पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीला वड्डी (ता. मिरज) येथे आज भीषण अपघात झाला. ट्रॅक्टर आणि चारचाकी गाडीच्या धडकेत बारा वर्षीय मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. दोन मुली जखमी आहेत. मृत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सरवडे या गावचे आहेत. त्यात एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि मुलगा तसेच त्यांची सासू यांचा समावेश आहे. सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
चौकट
मृत असे
या घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये चारचाकी गाडीचा चालक उमेश उदय शर्मा (वय २२, रा. शेळेवाडी, ता. राधानगरी), जयवंत दत्तात्रय पोवार (४२, रा. सरवडे, ता. राधानगरी), त्यांची पत्नी स्नेहल जयवंत पोवार (४०), मुलगा सोहम जयवंत पोवार (१२), सासू कोमल श्रीकांत शिंदे (५६, रा. रोहिदासनगर, इचलकरंजी), लक्ष्मण शंकर शिंदे (७०, रा. बानगे, ता. कागल) यांचा समावेश आहे. जयवंत पवार यांच्या दोन्ही मुली साक्षी आणि श्रावणी जखमी झाल्या आहेत.

पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की सरवडे (ता. राधानगरी) येथील जयवंत पवार पती स्नेहल पोवार, मुलगा सोहम, मुली साक्षी व श्रावणी पोवार यांच्यासह पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी निघाले होते. त्यांनी इचलकरंजी येथील नातेवाईकांना सोबत घेतले होते. जाताना वड्डी येथे राजीवनगर येथे बायपासला त्यांच्या गाडीला अपघात झाला.
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचा मालगाव फाटा ते मिरज टप्पा अपूर्ण होता. तो दोन दिवसांपूर्वीच सुरू झाला आहे. या रस्त्यावरून भरधाव वाहतूक सुरू झाली आहे. याआधी रस्ता बंद असताना अनेक वाहने उलट-सुलट दिशेने हवी तशी धावत होती. आजही या भागातील एक वीट वाहतूक करणारा ट्रॅक्टर (एमएच १०, डीजी ८६८३) उलट दिशेने येत होता. चारचाकी गाडी (एमएच ०९, डीए ४९१२) चालकाला अशा पद्धतीने ट्रॅक्टर येईल, हे अपेक्षित नसावे. त्यामुळे त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघाताची भीषणता भयावह होती. चारचाकीची ट्रॅक्टरला धडक बसल्यानंतर ट्रॅक्टरचा पुढील भाग पूर्णतः चारचाकीत घुसला. यात चालक उमेश शर्मा, जयवंत पोवार, पत्नी स्नेहल पोवार, मुलगा सोहम पोवार आणि नातेवाईक लक्ष्मण शिंदे, कोमल शिंदे यांचा मृत्यू झाला; तर पोवार यांच्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या. श्रावणी हिच्या मेंदूला मार लागला असून, साक्षीच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. पोवार कुटुंबावर काळाने घाला घालून दोन मुलींचे आई-वडील आणि भाऊ हिरावल्यानंतर त्या मुलींचे आधार हरपल्याची चर्चा अपघातस्थळी सुरू होती.
रत्नागिरी-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग तानंग फाटा ते मिरजपर्यंत बंद होता. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून तानंग फाटा ते मिरज रॉयल रजपूत गार्डनपर्यंत राष्ट्रीय महामार्ग पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. यामुळे सोलापूर, कवठेमहांकाळ येथून येणारी वाहतूक, तसेच कोल्हापूर, रत्नागिरी येथून येणाऱ्या वाहनांची मोठी वाहतूक या रस्त्यावर आहे. निष्काळजीपणामुळे ही गंभीर घटना घडली. घटनास्थळी पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपअधीक्षक अजित टिके, मिरज निरीक्षक नारायण देशमुख, गांधी चौकीचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.

रस्ता सुरू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी घटना
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग तानंग फाटा ते मिरज रजपूत रॉयल गार्डनपर्यंत बंद करण्यात आला होता. या मार्गावरील वाहतूक मिरज शहरातून वळवण्यात आली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी या अकरा किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीसाठी मिरज शहराबाहेरून हा रस्ता सुरू केला होता. अवघ्या दुसऱ्या दिवशी हा भीषण अपघातात सहा जणांना जीव गमवावा लागला.