पर्यटन मालिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटन मालिका
पर्यटन मालिका

पर्यटन मालिका

sakal_logo
By

लोगो-
पर्यटन विकासाचे अर्थकारण ः भाग १
---------------------------------------

मालिका लीड
कोल्हापुरात पर्यटक वाढत आहेत. त्यांना अपेक्षित सुविधा देण्यास प्रशासन कमी पडते. यात सुधारणा अपेक्षित आहेत. सध्या करवीर निवासी अंबाबाई आणि दख्खनचा राजा जोतिबा हेच पर्यटकांचा केंद्रबिंदू ठरत आहे. यालाच कर्नाटक, हैदराबाद, गोवा यांचा संदर्भ घेऊन पर्यटकांना सुविधांची जोड दिल्यास पर्यटनात अर्थकारण वाढण्यास मदत होईल. पर्यटक डोळ्यांसमोर ठेवून काही सुविधा दिल्यास शहरात येणारा पर्यटक जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पोचण्यास मदत होईल. नेमके काय करता येईल, याचा आढावा घेणारी मालिका आजपासून...
---

पर्यटकांसाठी हवे छोटे थिएटर
---
हैदराबादच्या धर्तीवर प्रयोग शक्य; पर्यटनाची ओळख पडद्यावर अर्ध्या तासात
लुमाकांत नलवडे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : तीर्थक्षेत्र, निसर्गाने नटलेल्या जिल्ह्याचा सांस्कृतिक ऐतिहासिक ठेवा एकाच ठिकाणी कोठेही पाहावयास मिळत नाही. पर्यटकांना अर्ध्या तासात ही ओळख करून देणारे एक छोटे थिएटर शहरात आवश्यक आहे. हैदराबाद येथील किल्ल्याजवळ अशा थिएटरची व्यवस्था आहे.
अवघ्या ५० रुपयांत संपूर्ण हैदराबाद शहराची ओळख. थोडक्यात, इतिहास आणि त्या किल्ल्याची माहिती २०-२५ मिनिटांत पडद्यावर दाखविली जाते. त्यामुळे वेळेअभावी किंवा पैशांअभावी सर्व ठिकाणी न फिरू शकणाऱ्या पर्यटकांना अर्ध्या तासात कमी पैशांत संपूर्ण जिल्ह्याची भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक माहिती देणे शक्य होते.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, दख्खनचा राजा जोतिबा, ऐतिहासिक पन्हाळा, तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी, राधानगरीचे अभयारण्य हे सर्व कोल्हापुरातून नेमके किती अंतरावर आहे, तेथे कोण कोणत्या व्यवस्था आहेत, जंगल सफारीची बुकिंग कोठे होते, या सर्वांची माहिती या चित्रफितीत दिली जाऊ शकते. याचबरोबर राजर्षी शाहू महाराजांची माहिती, कोल्हापूरचा इतिहास या निमित्ताने पर्यटकांसमोर पोचविणे शक्य होते.
हैदराबादमध्ये राजे-राजवाड्यांची माहिती १०० आसन क्षमता असलेल्या छोट्या थिएटरमध्ये दिली जाते. वेळेअभावी, पैशांअभावी ज्यांना हैदराबाद फिरणे शक्य नाही किंवा मार्गदर्शन म्हणूनही या थिएटरमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. कोल्हापूर शहरात भवानी मंडप, शाहू स्मारक भवन येथे हे थिएटर करणे जिल्हा प्रशासनासाठी सहज शक्य आहे. टूर, ट्रॅव्हल्स, हॉटेल्स यांच्या जाहिरातीच्या माध्यमातून येथील दैनंदिन खर्च निघू शकतो. इन्फ्रास्ट्रक्चर तयार असल्यास ४०-५० लाखांमध्ये असे अद्ययावत थिएटर उभे राहू शकते.