
क्रिकेट स्पर्धेत मुकबधीर खेळाडूंचे यश
gad182.jpg
03576
कोल्हापूर : क्रिकेट स्पर्धेत यश मिळविलेले मूकबधिर खेळाडू.
---------------------------------------------------
क्रिकेट स्पर्धेत मूकबधीर खेळाडूंचे यश
गडहिंग्लज : कोल्हापूरच्या मूक-कर्णबधीर युवा मंडळाच्या वतीने आयोजित मूकबधीर क्रिकेट स्पर्धेत तालुक्यातील १४ मूकबधीर खेळाडूंनी यश मिळवले. स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून रोहन पाथरवट, अमोल राणे या खेळाडूंनी बहुमान पटकावला. कर्णधार हरिष उमरगी, उपकर्णधार सचिन देवेकर यांच्या नेतृत्वाखालील खेळाडूंनी तृतीय क्रमांक पटकावून चषक मिळवला.
------------------------------------------------
माजी विद्यार्थी-शिक्षकांचा स्नेहमेळावा
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये दहावीच्या २००४ ची बॅच व चौथीची १९९८ च्या बॅचमधील विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेहमेळावा झाला. मुख्याध्यापक पंडित पाटील अध्यक्षस्थानी होते. प्राथमिकचे मुख्याध्यापक विजय कांबळे प्रमुख पाहुणे होते. स्मृतिचिन्हाने शिक्षकांना सन्मानित केले. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदीप कासारकर-पाटील, रोहित कापसे, राम पायमल्ले, सोनिया शिंदे, अश्विनी कदम यांच्या पुढाकाराने हा स्नेहमेळावा झाला. अश्विनी कदम यांनी सूत्रसंचालन केले. यास्मीन शेखने आभार मानले. राधिका ताशिलदारने पसायदान म्हटले. बाळासाहेब कुट्रे, बी. बी. कणबरकर, श्री. जगदाळे, आय. आर. चौगुले, अशोक कदम, प्रकाश शिंदे, व्ही. ए. देसाई आदी उपस्थित होते.