मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर

मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर

मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर
गडहिंग्लज पालिकेचा उपक्रम; ‘थ्री आर’ केंद्राचे उद्या उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १८ : शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानातंर्गत येथील पालिकेच्यावतीने मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानातूनच रिड्युस, रियूज व रिसायकल म्हणजेच ''थ्री-आर'' केंद्राची स्थापना बॅ नाथ पै विद्यालय येथे केली असून त्याचे उद्‍घाटन शनिवारी (ता. २०) होणार आहे. हे केंद्र सकाळी सात ते दुपारी एकपर्यंत सुरु राहणार आहे.
मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर हे अभियान २० मेपासून ५ जूनपर्यंत राबवण्यात येणार आहे. या अभियानाचा समारोप जागतिक पर्यावरणदिनी ५ जून रोजी स्वच्छता मोहिम व स्वच्छतेची प्रतिज्ञा घेवून केला जाणार आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी शहरातील अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही केले आहे.
केंद्रात जुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, पादत्राणे आणि इतर निरुपयोगी वस्तू नागरिकांकडून गोळा करुन त्यांचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्यावतीने ई-रिक्षा व घंटागाडीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच ई-रिक्षा शहराच्या विविध भागातून रोज या निरुपयोगी वस्तू गोळा करण्यासाठी फेरीही मारणार आहे. उपक्रमातंर्गत जमा केलेल्या वस्तूंची नोंद रजिस्टरमध्ये ठेवली जाणार आहे. गरजू नागरिकांनी त्यांना आवश्यक वस्तू या केंद्रातून घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच या अभियानातून टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवण्याच्या स्पर्धाही आयोजित केल्या आहेत. त्याचे प्रदर्शनही या केंद्रात भरवले जाणार आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षीसे व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या अभियानात शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com