तारदाळ : घोरपडीला जीवदान

तारदाळ : घोरपडीला जीवदान

ich188.jpg 03622
तारदाळ : येथे विहिरीत पडलेल्या घोरपडीला जीवदान दिले.

तारदाळमध्ये घोरपडीला जीवदान
तारदाळ : तारदाळ (ता. हातकणंगले) येथील शेतकरी तेजस मगदूम हे सकाळी शेताला पाणी पाजण्यासाठी विहिरीवरील मोटर सुरू करण्याकरिता गेले होते. त्यांना विहीरमध्ये घोरपड पडल्याचे दिसले. त्यांनी लगेच वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य सागर भुयेकर यांना ही माहिती फोनवरून दिली. माहिती मिळताच संस्थेचे सदस्य रेस्क्यू साहित्य घेऊन घटनास्थळी पोहोचले व पन्नास फूट खोल विहिरीत दोरीच्या साहाय्याने खाली उतरून त्या घोरपडीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्या घोरपडीला पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन वैद्यकीय तपासणी केली. सदर घोरपडेची तब्येत ठीक आहे याची खात्री होताच सापडलेल्या ठिकाणापासून पासून १०० मीटर अंतरावर तिला मुक्तपणे सोडण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com