इंडस्ट्रियल क्रिकेट लीग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंडस्ट्रियल क्रिकेट लीग
इंडस्ट्रियल क्रिकेट लीग

इंडस्ट्रियल क्रिकेट लीग

sakal_logo
By

फोटो - KOP23M03650,
कोल्हापूर : सकाळ माध्यम समूह व एच.आर. फोरमतर्फे शास्त्रीनगर मैदानावर सुरू असलेल्या इंडस्ट्रियल क्रिकेट लीग स्पर्धेत गुरुवारी किर्लोस्करचा गोलंदाज शंकर चौगुले यांच्या चेंडूवर दाना ग्रुपचा रावळू पाटील झेल बाद झाला तो क्षण.


किर्लोस्कर, वारणा, दाना ग्रुप, विलो उपांत्य फेरीत
सकाळ व एचआर फोरम इंडियातर्फे आयोजित स्पर्धा; फलंदाज, गोलंदाजांची कमाल कामगिरी.

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.१८ : इंडस्ट्रियल क्रिकेट लीग स्पर्धेत आज किर्लोस्कर ऑइल इंजिन, वारणा ग्रुप, दाना ग्रुप व विलो पंप्सने उपांत्य फेरीत प्रवेश केला. सकाळ व एचआर फोरम इंडिया कोल्हापूरतर्फे स्पर्धेचे आयोजन केले आहे. दत्ताजीराव परशुराम माने सराफ स्पर्धेचे मुख्य प्रायोजक, सेनर्जी सेफ्टी शूज सहप्रायोजक, तर वेलेटा-विथ मिनरल हायड्रेशन पार्टनर आहे. शास्त्रीनगर मैदानावर स्पर्धा सुरू आहे.

KOP23M03649
कॅस्प्रो विरुद्ध चमकदार कामगिरी केलेल्या किर्लोस्कर ऑईलच्या विश्वजित कुलकर्णी यांना सामनावीरचा चषक देताना भालचंद्र कुलकर्णी.

किर्लोस्कर ऑइल इंजिनने कॅस्प्रो मेटल इंडिया लिमिटेडवर ५४ धावांनी मात केली. किर्लोस्कर इंजिनने प्रथम फलंदाजी करताना ६ षटकांत १०७ धावांचा डोंगर रचला. त्यांच्या विश्‍वजित कुलकर्णी यांनी १४ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या. त्यांनी चार षटकार व तीन चौकार ठोकले. शंकर चौगुले यांनी १० चेंडूत ३३ धावांचे योगदान दिले. त्यांनी चार षटकार व दोन चौकार ठोकले. प्रत्युत्तरादाखल खेळताना कॅस्प्रोला ६ षटकांत ५३ धावा करता आल्या. त्यांचे पाच फलंदाज बाद झाले. कॅस्प्रोकडून विशाल चव्हाण यांनी १४ चेंडूत नाबाद २५ धावा केल्या. त्यात एक षटकार व दोन चौकारांचा समावेश होता. किर्लोस्करकडून अमर पाटील व मंगेश जगदाळे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. किर्लोस्करचे विश्‍वजित कुलकर्णी सामनावीर ठरले.
००००००००००००००

KOP23M03647
व्ही. पी. ग्रुप विरुद्ध अप्रतिम खेळ करणाऱ्या वारणा ग्रुपचा सामनावीर संजय जमदाडे यांना चषक देताना पवन वाडकर.

१४.२ षटकात
१८७ धावांचा पाऊस

वारणा ग्रुपने व्ही. पी. ग्रुपवर सात गडी राखून मात केली. व्ही. पी. ग्रुपने ८ षटकांत ९३ धावा केल्या. त्यांच्या श्रीधर पाटील यांनी घणाघाती फलंदाजी करताना २० चेंडूत ६१ धावा केल्या. त्यांनी सहा षटकार व चार चौकार मारले. भारत निकम यांनी १७ चेंडूत नाबाद १८ धावा केल्या. वारणाकडून घनशाम भांडवले व अमोल लठ्ठे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल वारणाने ६ षटके व दोन चेंडूत ९४ धावा फटकावून सामना जिंकला. त्यांच्या संजय जमदाडेने १४ चेंडूत ३२ धावांचे योगदान दिले. त्यांना सामनावीरचा मान देण्यात आला.
०००००००००००००००००

KOP23M03645
किर्लोस्कर ऑइल विरुद्ध उत्कृष्ट खेळ करणाऱ्या दाना ग्रुपच्या हणमंत कोकितकर यांना सामनावीरचा चषक देताना गौतम चौगले.

दाना ग्रुपचा
तडाखेबंद विजय
दाना ग्रुपने किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचा ८ गडी राखून पराभव केला. किर्लोस्करने ८ षटकांत सात गडी गमावून ७१ धावा केल्या. त्यांच्या शंकर चौगुले यांनी १८ चेंडूत १९ धावा केल्या. दाना ग्रुपकडून हणमंत कोकितकर यांनी तीन, तर दिनकर पाटील यांनी दोन गडी बाद केले. दाना ग्रुपने ४ षटके व एक चेंडूत ७४ धावा फटकावून विजय मिळवला. त्यांच्या दिनेश मोरे यांनी दहा चेंडूत नाबाद ३०, तर हेमंत कोकितकर यांनी ८ चेंडूत २४ धावा फटकावल्या. किर्लोस्करकडून शंकर चौगुले यांनी दोन गडी बाद केले. दाना ग्रुपचे हणमंत कोकितकर सामनावीर ठरले.
०००००००००००००००

KOP23M03643
कॅस्प्रो मेटलविरुद्ध चमकदार कामगिरी केलेल्या विलो पंप्सच्या अजय कोरे यांना सामनावीरचा चषक देताना अनंत पाटील.
विलो पंप्सचा
झटपट विजय
विलो पंप्सने कॅस्प्रोवर सात गडी राखून विजय मिळवला. कॅस्प्रोने ८ षटकांत ६८ धावा केल्या. त्यांच्या विशाल चव्हाण यांनी २५ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या. त्यांनी दोन षटकार व तीन चौकार मारले. विलोकडून अजय कोरे यांनी दोन व सागर जाधव यांनी एक गडी बाद केला. विलोने ५ षटके व २ चेंडूत ७० धावा फटकावून सामना जिंकला. विलोकडून प्रवीण शांदगे यांनी ११ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या. कॅस्प्रोकडून जिगर राठोड नाबाद दोन गडी बाद केले. विलोच्या अजय कोरे यांना सामनावीरचा मान देण्यात आला.
०००००००००००००००

KOP23M03642
घाटगे पाटील इंडस्ट्रीजविरुद्ध सर्वोत्कृष्ट खेळ करणाऱ्या दाना ग्रुपच्या रावळू पाटील यांना सामनावीरचा चषक देताना प्रकाश राठोड.

‘घाटगे पाटील’वर
दाना ग्रुपची मात
दाना ग्रुपने घाटगे पाटील इंडस्ट्रीज कोल्हापूरवर आठ गडी राखून विजय मिळवला. घाटगे-पाटील कोल्हापूरने ६ षटकांत ५७ धावा केल्या. त्यांच्या अश्‍लेश कांबळे यांनी २१ चेंडूत ३७ धावा केल्या. दाना ग्रुपकडून पुंडलिक पाटील व रावळू पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल दाना ग्रुपने ४ षटके व दोन चेंडूत ६१ धावा केल्या. त्यांच्या हणमंत कोकितकर यांनी ११ चेंडूत २५, तर रावळू पाटील यांनी तीन चेंडूत १३ धावा केल्या. दाना ग्रुपच्या रावळू पाटील यांना सामनावीरचे बक्षीस देण्यात आले.
०००००००००००००००००००००

KOP23M03641
किर्लोस्कर ब्रदर्सविरुद्ध चांगल्या खेळाचे दर्शन घडविणाऱ्या वारणा ग्रुपच्या घनशाम भांडवले यांना सामनावीरचा चषक देताना आबासाहेब मेडशिंगे.
वारणा ग्रुपचा
धडाका कायम
वारणा ग्रुपने किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडवर पाच गडी राखून मात केली. किर्लोस्करने ६ षटकांत ६७ धावा केल्या. त्यांच्या अझर शेख यांनी २१ चेंडूत नाबाद ४९ धावा केल्या. वारणाकडून घनशाम भडवळे यांनी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल वारणाने ५ षटके व ५ चेंडूत ६८ धावा फटकावून सामना जिंकला. वारणाच्या संजय जमदाडे यांनी ११ चेंडूत ४१, तर घनशाम भांडवले यांनी ११ चेंडूत १२ धावा केल्या. किर्लोस्करकडून सुशांत कदम व अझर शेख यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. घनशाम भांडवले यांना सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.
००००००००००००

KOP23M03640
सप्रे प्रिसिजनच्या विरुध्द अप्रतिम खेळ करणाऱ्या कॅस्प्रोच्या विशाल चव्हाण यांना सामनावीरचे चषक देताना सचिन पाटील.

कॅस्प्रो मेटल इंडस्ट्रीजने सप्रे प्रिसिजन टेक्नॉलॉजीसवर ७ गडी राखून मात केली. सप्रे प्रिसिजनने ६ षटकांत ६५ धावा केल्या. त्यांच्या रोहन चरणकर यांनी ८ चेंडूत १६ धावा केल्या. कॅस्प्रोकडून विशाल चव्हाण यांनी तीन, तर जिगर राठोड यांनी एक गडी बाद केला. कॅस्प्रोने ५ षटके व चार चेंडूत ६७ धावा फटकावून सामना जिंकला. त्यांच्या संतोष निकम यांनी १५ चेंडूत ४० धावा केल्या. त्यात सहा षटकारांचा समावेश होता. अभिजित हवालदार यांनी १५ चेंडूत १६ धावा केल्या. सप्रेकडून प्रसाद पाटील यांनी एक गडी बाद केला. कॅस्प्रोच्या विशाल चव्हाण सामनावीर ठरले.
-------------
उपांत्य फेरीतील
* विलो पंप्स विरुद्ध वारणा ग्रुप - सकाळी ९ वाजता
* दाना ग्रुप विरुद्ध किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, वेळ - सकाळी ११ वाजता.
* अंतिम सामना- दुपारी ३